मुंबई, १२ मे २०२४, प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीला सुरूवात झाली आहे. बघता बघता बघता राज्यातील लोकसभा निवडणुकीचा पाचवा आणि शेवटचा टप्पा पार पडणार आहे. रविवारपासून पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला सुरूवात झालेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन जाहीर सभा होणार आहेत. या दोन्ही सभा मुंबईत होणार आहेत. पहिली सभा साकीनाका येथे होणार आहे. तर दुसरी सभा विक्रोळीमध्ये होणार आहे. विक्रोळी येथील सभा मिहीर कोटेचा यांच्या प्रचारार्थ होणार आहे.