मुंबई - विधानसभा निवडणुकीत महायुतीने आपले वर्चस्व स्थापित केले. मात्र निवडणूकीच्या निकालानंतर ते शपथविधी पर्यंत ह्या १०-१५ दिवसांच्या काळात महायुती खाते वाटप कसे करेल ह्यावर सर्वांचेच लक्ष होते.
शिवसेनेचे रत्नागिरीचे आमदार उदय सामंत ह्यांना जेव्हा विचारलं गेलं शिंदे नाराज आहेत का ? तर उदय सामंत म्हणाले 'शिंदेसाहेब नाराज नाहीत काम जोमाने सुरु आहे. असं वक्तव्य त्यांनी केलं पुढे बोलताना ते म्हणाले मंत्रिमंडळ जो वर स्थापन होत नाही तो पर्यंत तिन्ही नेते (देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार) सक्षम आहेत. मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होइल. हिवाळी अधिवेशनाच्या आधी विस्तार होइल असं देखील सामंत ह्यावेळी म्हणले.
ईव्हीएमविषयी बोलताना सामंत म्हणाले 'एकीकडे इव्हीएमच्या नावावर बोंबाबोब करायची. ही भुमिका महाराष्ट्राला समजली म्हणून विरोधक ४०-५० वर आले.
आणि आता मविआमध्ये पण फूट पडत आहेत. लोकांची माथी भडकवायची हा विरोधकांचा डाव आहे. शरद पवारांविषयी ते म्हणाले 'नियम लावताना खासदारकीला एक आणि विधानसभेला एक नियम. इतर ठिकाणी इव्हीएम चांगलं जिकडे हरतात तिकडे वाईट. अश्या शब्दात त्यांनी शरद पवारच्या वक्तव्यांची निंदा केली. राहुल गांधींविषयी बोलताना सामंत म्हणाले 'ईव्हीएम विरोधी वातावरण निर्माण करण्यापेक्षा जे अपयश आले आहे त्याचा स्वीकार करा, हा जो चालू आहे तो अपयश झाकण्याचा हा प्रयत्न आहे'. विरोधक जिंकून आले ते देखील ईव्हीएमवर जिंकून आले आहेत हे त्यांनी विसरू नये असा शेवटी संदेश पण उदय सामंतांकडून देण्यात आला.