मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत अनेक विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. रामदास कदम आणि प्रसाद लाड यांच्यातील वादावर त्यांनी मध्यस्थीची भूमिका घेतली, तर भाजपमधील नेत्यांसह स्वकीयांनाही स्पष्ट शब्दांत सुनावले. दरम्यान त्यांना उदय सामंत यांना मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यांच्या वक्तव्यामुळे महायुतीतील राजकीय घडामोडींची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. यावेळी उदय सामंत म्हणाले की, “माझी मुख्यमंत्री होण्याची अजिबात इच्छा नाही. ज्यांनी मला आमदार केले, मंत्री केले त्यांच्या शब्दाच्या त्यांच्या पुढे कधीही जाणार नाही.”
पुढे रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्यावर उदय सामंत म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांनी या बाबतीतील भूमिका स्पष्ट केली आहे 500 कोटीचा हा विषय संपला आहे. मुख्यमंत्री या बाबत आपली भूमिका मांडली आहे. रामदास कदम यांनी आपली भावना मांडली असेल. प्रसाद लाड यांनी ही आपली भूमिका मांडली असेल, पण हे कुठे तरी थांबले पाहिजे. रामदास कदम हे वरिष्ठ नेते आहेत, सगळ्या नेते मंडळींना माजी विनंती आहे हे सरकार महायुतीचे आहे, काहीना ते बघवत नाही. दोन्ही संघटनांमध्ये फूट पाडण्याचा कोणी तरी प्रयत्न करत असेल त्याचा विचार व्हावा. रामदास कदम यांचीही ऑडिओ क्लिप असेल तर सध्या AI ची पण असू शकेल. पण सत्य समोर आले पाहिजे.”
तसेच भाजपवर बोलताना म्हणाल्या की, “प्रत्येकाच्या स्टेंटमेटला उत्तर देण्यापेक्षा मुख्यमंत्री यांची भूमिका महत्वाची आहे. आपापसातील वादामुळे महायुतीमध्ये वाद होऊ नये, आणि ज्यांना ही करायचे आहे ते होऊ देऊ नये. रामदास भाई हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर प्रसाद लाड दूर करतील. क्लिपची फॉरेन्सिक चौकशी केली जाणार असे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. आरोपप्रत्यारोपातून फार काही निष्पन्न होईल असे वाटत नाही. फडणवीस चौकशी करून काय म्हणतात हे आम्हाला पहायचे आहे, त्या भूमिकेची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. मग नेते आणि प्रवक्ते काय म्हणतात त्यापेक्षा मुख्यमंत्री महत्वाचे आहे. शिंदे साहेबांमुळे मी मंत्री झालो, पण कोणत्या ही क्लिप सी जोडू नका.”