सिंधुदुर्ग जिल्ह्यात वफ्फ बोर्डाच्या जमिनींवर दावा करणाऱ्या मंत्री नितेश राणे यांचा दावा आता सत्यात उतरतोय की काय असा प्रश्न सर्वानाच पडलाय. मंत्री नितेश राणे यांनी एका कार्यक्रमादरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 50 ते 60 टक्के जमिनींवर वफ्फ बोर्डाचा दावा असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने तात्काळ तपास सुरू केला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील बांदा ग्रामपंचायत हद्दीत 49 सातबाऱ्यांवर वफ्फ प्रतिबंधित सत्ता प्रकार असलेले शेरे आढळून आले.
हेही वाचा: Maha Khumbh Mela 2025: प्राजक्ता माळीने केले महाकुंभात शाहीस्नान
वफ्फ बोर्डाने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय जमिनींचा दावा केल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे. बांदा ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रियंका नाईक यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, "माझ्या ग्रामस्थांना काही जमिनी वफ्फ बोर्डाने पूर्वसूचना न देता आपल्या अधीन करून घेतल्या आहेत. ग्रामपंचायत म्हणून आम्ही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे आणि या जमिनी त्यांच्या मालकांना परत मिळाव्यात अशी आम्ही मागणी करत आहोत."
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 49 सातबाऱ्यावर वफ्फ बोर्डाच्या नोंदी आढळल्यानंतर हिंदू एकता मंचाचे निलेश सावंत यांनी कडक प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांचा आरोप आहे की, "बांदा गाव सारख्या छोट्या गावात बेकायदेशीरपणे वफ्फ बोर्डाने 49 सातबाऱ्यावर नोंदी केल्या आहेत. ही नोंदी तात्काळ रद्द करावी," अशी मागणी त्यांनी केली.
हेही वाचा: एकनाथ शिंदेंबाबत बच्चू कडू यांचं वक्तव्य चर्चेत
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री यांनी याबाबत केलेल्या वक्तव्याला आता पुष्टी मिळाल्याने प्रशासनाला सर्व आठ तालुक्यांमध्ये तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांनी सर्व तहसीलदारांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणामुळे जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये अशी नोंदी आहेत का, याबाबतही प्रशासनाने सखोल तपासणी सुरू केली आहे. वफ्फ बोर्डाच्या नोंदींच्या या प्रकरणात स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या दरम्यान तीव्र असंतोष पसरलेला आहे. यावर तात्काळ उपाय योजना आवश्यक आहे.