मुंबई : गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसेंचा भाजपा प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. सध्या खडसे दिल्लीत असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर ते पक्ष श्रेष्ठींची चर्चा करणार आहेत. भाजपमध्ये खडसेंना मोठी जबाबदारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपा विचार मंथन सुरू केले आहे. भाजपाला लोकसभेत मोठा फटका बसला आहे. त्यामुळे भाजपाला संघटनाची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपा खडसेंची घरवापसी करणार असल्याचे म्हटले जात आहे. आधी त्यांनी पक्ष वाढीसाठी काम केले आहे. तसेच त्यांना भाजप आणि संघाची रणनीती माहिती आहे. त्यामुळे खडसेंना भाजपामध्ये मोठी जबाबदारी देणार असल्याची माहिती आहे. विधानसभेच्या तयारीच्या दिशेने भाजपाची तयार चालु आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बावनकुळेंना पत्रकारांनी खडसेंना पक्षात मोठी जबाबदारी देणार असल्याचा प्रश्न विचारला. यावर अद्याप खडसेंचा भाजपात प्रवेश झाला नाही. ज्यावेळी ते भाजपामध्ये येतील तेव्हा बघु असे सूचक वक्तव्य बावनकुळेंनी केले. त्यामुळे खडसे भाजपात येतील का? खडसेंना पक्षात काय जबाबदारी दिली जाईल. यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.