Thursday, July 18, 2024 11:16:43 PM

नव्या नियमांसह शुक्रवारपासून आयपीएल

नव्या नियमांसह शुक्रवारपासून आयपीएल

चेन्नई, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : नव्या नियमांसह शुक्रवार २२ मार्च पासून आयपीएल २०२४ क्रिकेट स्पर्धा सुरू होत आहे. आयपीएलचा पहिला सामना शुक्रवारी रात्री आठ वाजता चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये सुरू होणार आहे. या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपरकिंग्स हा संघ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांची टक्कर होईल. यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येक षटकात दोन बाउन्सर टाकण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक संघाला दोन रेफरल अर्थात पंचांच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी करण्याचे दोन पर्याय मिळणार आहेत. वाईड आणि नो बॉल यांची तिसऱ्या पंचांकडून खात्री करून घेण्याचा स्वतंत्र पर्याय पण उपलब्ध असेल.

           

सम्बन्धित सामग्री