Saturday, March 07, 2026 06:15:41 AM

T20 World Cup Abhishek Sharma : अभिषेक शर्मा गंभीरच्या रांगेत; तिसऱ्यांदा अभिषेक शर्माच्या नावावर लाजिरवाणा विक्रम

7 फेब्रुवारीपासून टी20 वर्ल्डकप 2026 ला सुरुवाती झाली आहे. अशातच पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्माच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.

t20 world cup abhishek sharma  अभिषेक शर्मा गंभीरच्या रांगेत तिसऱ्यांदा अभिषेक शर्माच्या नावावर लाजिरवाणा विक्रम

7 फेब्रुवारीपासून टी20 वर्ल्डकप 2026 ला सुरुवाती झाली आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अमेरिकेवर 29 धावांनी मात करत घरच्या मैदानावर स्पर्धेची सुरुवात दणक्यात केली आहे. यावेळी कर्णधार सूर्यकुमार यादव खऱ्या अर्थाने संघासाठी खेळपट्टीवर पाय रोवून उभा राहिला होता. दरम्यान सलामीवीर अभिषेक शर्मा पहिल्याच चेंडूवर तंबूत परतला आणि तिथूनच भारताच्या डावाची पडझड सुरू झाली. 

हेही वाचा- T20 World Cup: गोलंदाजांची धार अन् सूर्याचा प्रहार; अमेरिकेचा 29 धावांनी पराभव करत वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने रोवला विजयाचा झेंडा
अली खानने अभिषेक शर्मासमोर बॉल फिरवताच अभिषेक शर्माने डीप कव्हरच्या दिशेने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, जो अपयशी ठरला आणि संजय कृष्णमूर्तीने बाऊंड्री लाईनवर अभिषेकचा कॅच पकडला. यावेळी अभिषेक शर्मा पहिल्याच बॉलला शून्यावर बाद झाला ज्यामुळे त्याच्या नावावर गोल्डन डकची नोंद झाली आहे. अभिषेक शर्मासोबत असं तिसऱ्यांदा झालं आहे, याआधी तो न्यूझीलंडविरूद्धच्या टी20 मालिकेत दोन वेळा गोल्डन डकवर बाद झाला होता.

हेही वाचा- India vs Pakistan : ICC च्या कडक पवित्र्यासमोर पाकिस्तान नरमले; भारत-पाक सामन्यावरील बहिष्काराच्या नाट्याला नवे वळण

अभिषेक शर्माच्या आधीही 19 वर्षांपुर्वी गौतम गंभीरने देखील असंच काहीस केलं होत. 2007 मध्ये पहिल्यांदा टी20 वर्ल्डकपमधील पदार्पणाच्या सामन्यात गौतम गंभीर शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर आता अभिषेक शर्माने त्याच्याच पाऊलावर पाऊल ठेवल्याचे पाहायला मिळाले आहे. गोल्डन डकमध्ये नोंद होणारा अभिषेक शर्मा पहिला खेळाडू नसून यापुर्वी गौतम गंभीर, आशिष नेहरा, शार्दुल ठाकूर आणि दीपक हुड्डा यांनी देखील वर्ल्ड कपच्या सामन्यात पहिल्याच बॉलवर बाद होत गोल्डन डकमध्ये आपली नोंद केली आहे. 


सम्बन्धित सामग्री