IPL मध्ये दणदणीत धावा करणारा खेळाडू आगामी IPL 2027 मध्ये सनराईज हैदराबाद सोडणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिषेक शर्मा दिल्ली कॅपिटल्समध्ये जाणार आणि कर्णधार बनणार असल्याचे सांगितले जात आहे.
दिल्लीत जाण्याचे कारण काय सांगितलं जातंय?
मीडिया रिपोर्टनुसार, आगामी सीजनसाठी SRH ने पॅट कमिन्सच्या दुखापतीनंतर ईशान किशनकडे कर्णधारपद दिल्याने अभिषेक नाराज असल्याचे बोलले जात आहे. तसेच त्याचे गुरू युवराज सिंग आता दिल्ली कॅपिटल्सच्या कोचिंग सेटअपमध्ये असल्याने ही जोडी पुन्हा एकत्र येईल, अशी कुजबूज आहे.
गुरू-शिष्य जोडी पुन्हा दिसणार?
युवराज सिंग हा अभिषेकला आपला गुरू मानतो आणि दिल्लीत युवराज असल्याने ही चर्चा जास्त रंगली आहे.
हा सीझन दिल्ली कॅपिटल्स गाजवणार का?
दिल्ली कॅपिटल्स हा IPL च्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी संघांपैकी एक मानला जातो. 2008 पासून खेळत असूनही संघाला एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. दरवर्षी मोठी नावे घेऊनही शेवटच्या क्षणी संघ कोलमडतो. त्यामुळे जर अभिषेकसारखा फॉर्मात असलेला सलामीवीर आणि युवराज-गांगुलीसारखी कोचिंग जोडी एकत्र आली, तर 18 वर्षांपासून ट्रॉफीची वाट पाहणाऱ्या दिल्लीच्या चाहत्यांसाठी हे मोठे गिफ्ट ठरू शकते.
पण सत्य काय आहे?
SRH चे CEO के. शनमुगम यांनी ही अफवा स्पष्टपणे फेटाळून लावली असून हे वृत्त “खरे नाही” असे म्हटले आहे. सध्या ही फक्त अनौपचारिक चर्चा आहे, दिल्लीसोबतच मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्जचीही नावे चर्चेत आहेत, कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
(महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर) –