Asia Cup Trophy Controversy: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांची नोकरी धोक्यात आली आहे. 2025 च्या आशिया कप स्पर्धेत भारताला ट्रॉफी देण्यास त्यांनी नकार दिल्यामुळे पुढील महिन्यात त्यांना शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. गेल्या महिन्यात टीम इंडियाने त्यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर मोहसिन नक्वी यांनी आशिया कप ट्रॉफी स्व:ताकडे ठेवली.
हेही वाचा - Hardik Pandya Viral Video: एअरपोर्टवर हार्दिक पांड्याचा नवा अंदाज! गर्लफ्रेंड माहिका शर्मा सोबतचा व्हिडिओ व्हायरल
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने त्यांच्या हातून ट्रॉफी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. तथापी, आता बीसीसीआय पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत नक्वी यांना फटकारण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे ते आयसीसी संचालक म्हणून त्यांचे पद गमावू शकतात.
हेही वाचा - IPL Auction 2026 : डिसेंबरमध्ये होणार IPL 2026 साठीचा लिलाव?; खेळाडूंना कायम ठेवण्याची अंतिम मुदत निश्चित
दरम्यान, भारताने सुपर फोरमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना हस्तांदोलनावर बहिष्कार टाकला. तसेच अंतिम फेरीतही ही प्रथा चालू ठेवली. अशाच प्रकारे, महिला एकदिवसीय विश्वचषकातही भारत-पाकिस्तान सामन्यात हस्तांदोलन झाले नाही. प्राप्त माहितीनुसार, ही ट्रॉफी सध्या एसीसीच्या ताब्यात आहे. नक्वी यांनी 28 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्याच्या दिवशी मैदानावरून ती घेतली आणि नंतर ती परत करण्यास नकार दिला. नक्वी हे पाकिस्तानचे गृहमंत्री असून त्यांनी पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर टीका केली होती.