भारतात सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट. वनडे, T20 असो किंवा IPL, प्रत्येक फॉरमॅटला क्रिकेटप्रेमी भरभरून प्रतिसाद देतात. यात सर्वात जास्त लोकप्रिय असलेला फॉरमॅट म्हणजे इंडियन प्रीमियर लीग. या लीगमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार कोण असेल तर तो मुंबई इंडियन्सचा लाडका हिटमॅन रोहित शर्मा आहे.
रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत मुंबई इंडियन्सने तब्बल 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे. अत्यंत संयमी आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचा खेळाडू म्हणून ओळख असलेल्या रोहितने भारतीय संघाचेही अनेकवेळा नेतृत्व केले आहे.
मात्र गेल्या 3 वर्षांपासून तो आयपीएलमध्ये केवळ खेळाडू म्हणून खेळताना दिसत आहे. 2023 नंतर त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेत हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले होते. 2013 ते 2023 या 10 वर्षांच्या काळात रोहितने मुंबईचे नेतृत्व केले होते.
रोहितच्या चाहत्यांसाठी मात्र ही निराशाजनक बाब होती. त्याची कॅप्टन्सी, मैदानावरील निर्णय क्षमता आणि शांत डोके यासाठी चाहते आजही वेडे आहेत. आयपीएलमध्ये त्याला कर्णधार म्हणून न पाहता आल्याने चाहते नाराज होते.
मात्र आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या मीडिया रिपोर्टनुसार, आगामी आयपीएल 2027 मध्ये रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अद्याप मुंबई इंडियन्स फ्रँचायझी किंवा BCCI कडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, पण दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने जिंकलेली विजेतेपदे:
– आयपीएल 2013
– आयपीएल 2015
– आयपीएल 2017
– आयपीएल2019
– आयपीएल 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.