मुंबई इंडियन्सची धुरा पुन्हा रोहित शर्माकडे? नव्या प्रशिक्षकाचीही लवकरच घोषणा होणार

हार्दिक पंड्याची कर्णधारपदावरून हकालपट्टी होणार, हे जवळपास निश्चित आहे. कर्णधार आणि खेळाडू म्हणून हार्दिकची कामगिरी निराशाजनक राहिली आयपीएल 2027 मध्ये हार्दिक पंड्या मुंबईकडून खेळताना दिसेल, याची शक्यताही कमीच आहे.
मुंबई इंडियन्स, आयपीएल २०२७
Mumbai Indians, IPL 2027

मुंबई: मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. 2013 ते 2020 या आयपीएलच्या आठ हंगामांत मुंबईने पाच विजेतेपदे आपल्या नावावर केली. अलीकडच्या काळात मुंबईला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. रोहित शर्माला डावलून हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार करणं म्हणा, संघातील काही खेळाडू हार्दिक पांड्याला पुरेशी साथ देत नाहीत म्हणा किंवा हार्दिकला कर्णधारपद दिल्यामुळे संघात दोन गट पडले म्हणा, अशा बऱ्याच बातम्या समोर आल्या होत्या. आता या सगळ्या गोष्टींवर मात करत मुंबई इंडियन्सने नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. याची सुरुवात महेला जयवर्धने याला निरोप देण्यापासून झाली. जयवर्धनेपाठोपाठ कर्णधार हार्दिक पंड्या आणि गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगा यांचाही ‘नंबर’ लागू शकतो. जेवढ्या मोठ्या प्रमाणात ‘आउटगोइंग’ होणार आहे, तेवढ्याच प्रमाणात संघात ‘इनकमिंग’ही होणार आहे. या संदर्भात कोणत्या बातम्या समोर येत आहेत, ते जाणून घेऊया.

रोहित शर्माचं कर्णधार म्हणून पुनरागमन

हार्दिक पंड्याची कर्णधारपदावरून हकालपट्टी होणार, हे जवळपास निश्चित आहे. कर्णधार आणि खेळाडू म्हणून हार्दिकची कामगिरी निराशाजनक राहिली.आयपीएल 2027 मध्ये हार्दिक पंड्या मुंबईकडून खेळताना दिसेल, याची शक्यताही कमीच आहे. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सची सूत्रं रोहित शर्माच्या हाती जाण्याच्या बातम्या समोर येत आहेत. 2028 मध्ये आयपीएलचा मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामुळे एक वर्षासाठी नवा आणि अनुभवहीन कर्णधार बनवणं मुंबई इंडियन्स नक्कीच टाळेल. रोहितसोबत तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या नावांचीही कर्णधारपदासाठी चर्चा आहे. मुंबई इंडियन्स ईशान किशनला ट्रेड करून संघाचा कर्णधार बनवेल, अशीही सूत्रांची माहिती आहे.

हेही वाचा – IPL 2027 मिनी-ऑक्शनची तारीख ठरली! ‘या’ तारखेला गोव्यात लागणार खेळाडूंची बोली

नव्या प्रशिक्षकाच्या नावाची लवकरच घोषणा

मुंबई इंडियन्सच्या नव्या प्रशिक्षकाची लवकरच घोषणा होणार आहे. या पदासाठी अनेक दावेदारांची नावे समोर येत आहेत. राहुल द्रविड, ओएन मॉर्गन, ॲरॉन फिंच, केविन पीटरसन, रॉबिन पीटरसन, ॲडम वोजेस आणि एड्रियन बिरेल ही त्यांपैकी काही नावे आहेत. यात मॉर्गन आणि फिंच यांना प्रशिक्षकपदाचा अनुभव नाही, तर ॲडम वोजेस आणि एड्रियन बिरेल यांचे लीग क्रिकेटमधील ‘रेकॉर्ड’ उत्तम आहे. ॲडम वोजेस याने देशांतर्गत आणि फ्रँचायझी क्रिकेटमध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून 8 प्रमुख ट्रॉफी जिंकल्या आहेत, तर ॲड्रियन बिरेल याने मुख्य प्रशिक्षक म्हणून 4 प्रमुख फ्रँचायझी आणि देशांतर्गत जेतेपदे जिंकली आहेत.

रोहित शर्मा आणि राहुल द्रविड ही कर्णधार-प्रशिक्षकाची जोडीदेखील आपल्याला पुन्हा निळ्या जर्सीत दिसू शकते. येत्या काही दिवसांत मुंबई इंडियन्सबाबतचं चित्र नक्कीच स्पष्ट होईल. तोपर्यंत क्रिकेटरसिकांचा उत्साह शिगेला पोहोचेल, हे मात्र नक्की आहे.

महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर
https://www.jaimaharashtranews.com/blog/maharashtra-news-live-update-3/982848

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version