विहिरीच्या खोदकामात काळाचा घाला; चुलता-पुतण्याचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Baramati Well Accident : बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ येथील रसाळवाडीमध्ये विहिरीच्या खोदकामादरम्यान मोठी दुर्घटना घडली. मातीचा ढिगारा कोसळल्याने चुलता-पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अन्य दोन मजूर सुदैवाने बचावले आहेत.

विहिरीच्या खोदकामात काळाचा घाला; चुलता-पुतण्याचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Baramati Well Accident

बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ या हद्दीमधील रसाळवाडी क्रमांक एक येथे विहिरीच्या कामादरम्यान अत्यंत मोठी दुर्घटना घडली आहे. मातीच ढिगारा कोसळून चुलत्या-पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. मच्छिंद्र रामचंद्र रसाळ (वय55) आणि अमोल धनाजी रसाळ (वय27)अशी मृतांची नावे असून या दुर्घटनेत अन्य दोन मजूर सुदैवाने बचावले आहे.

डोळ्यांदेखत मातीचा ढिगारा कोसळला
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज 11 वाजण्याच्या दरम्यान घडली. रसाळवाडी येथे तलावालगत असलेल्या रसाळ कुटुंबाच्या विहिरीचे पोकलेनच्या साहाय्याने खोदकाम सुरु होते. विहीर ही सुमारे 30 ते 35 फूट खोल खोजण्यात आलेली होती. तर पुढील कामासाठी सुरंग लावण्यापूर्वी मोटार काढण्यासाठी मच्छिंद्र आणि अमोल हे दोघ विहिरीत उतरले होते. नेमकं त्याचवेळी इतर दोन मजूर सुरुंगासाठी भोक पाडण्याचे काम करत होते.

हेही वाचा – सासऱ्यांना रुग्णालयात दाखल केलं अन् जावयाच्या घरी विपरीत घडलं; अख्खं गाव हादरलं

हे काम सुरु असतानाच अचानक विहिरीच्या काठावरील मुरुम-मातीचा मोठा ढिगारा थेट कोसळला आणि दोघेही त्याखाली गाडले गेले. डोळ्यांदेखत घडलेल्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली. बाहेर असलेल्या लोकांनी कोणताही वेळ वाया न घालवता पोकलेनच्या मदतीने बचावकार्य सुरु केले. मोठ्या प्रयत्नानंतर दोघांना बाहेर काढून बारामतीच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 

महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number