भारतीय पॅरा-जलतरणपरटू मोहम्मद शम्स आलम शेखवर जपानमध्ये विनयभंगाचा गंभीर आरोप! आजन्म बंदीची शिफारस

या घटनेनंतर स्थानिक जपानी पोलिसांनी या जलतरणपटूला तात्काळ ताब्यात घेतले होते आणि त्यानंतर त्याला भारतात रवाना करण्यात आले.
Mohammad Shams Aalam Shaikh
Mohammad Shams Aalam Shaikh

Mohammad Shams Aalam Shaikh lifetime ban PCI: जपानमधील आयची-नागोया (Aichi-Nagoya) येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा खेळांमधून (Asian Para Games) भारतीय पॅरा-जलतरणपटू (Swimmer) मोहम्मद शम्स आलम शेख याला तातडीने भारतात परत पाठवण्यात आले आहे. भारतीय पोहण्याच्या संघाचा मुक्काम असलेल्या हॉटेलमधील एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग आणि लैंगिक छळ केल्याचे गंभीर आरोप या 40 वर्षीय खेळाडूवर झाले आहेत. या घटनेनंतर स्थानिक जपानी पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले होते आणि त्यानंतर त्याला भारतात रवाना करण्यात आले. या लाजिरवाण्या प्रकरणामुळे पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाने (PCI) गुरुवारी त्याच्यावर आयुष्यभरासाठी (Lifetime Ban) बंदी घालण्याची शिफारस केल्याची माहिती अधिकृतपणे दिली आहे.

पॅरालिम्पिक कमिटीची कठोर भूमिका; गैरवर्तनाविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ धोरण जाहीर
या धक्कादायक घटनेबाबत स्पष्टीकरण देताना ‘पीसीआय’ने (PCI) म्हटले आहे की, लैंगिक गैरवर्तन किंवा कोणत्याही व्यक्तीच्या प्रतिष्ठेला, सुरक्षिततेला आणि हक्कांना बाधा पोहोचवणाऱ्या वर्तनाविरुद्ध संस्था अत्यंत कठोर असून ‘झिरो टॉलरन्स’ (Zero-tolerance) धोरण राबवते. भारतीय क्रीडा पथकातील प्रत्येक खेळाडू आणि सदस्याने उच्च दर्जाची शिस्त, खेळभावना व आचारसंहितेचे पालन करणे अनिवार्य आहे. आशियाई पॅरा स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्व खेळाडूंना आणि पथकातील सदस्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या, वर्तन आणि शिस्तीचे महत्त्व पटवून देण्यासाठी विशेष वेबिनार आयोजित करून प्रशिक्षित करण्यात आले होते, असेही समितीने आपल्या निवेदनात स्पष्ट केले.

हेही वाचा – हार्दिक पांड्याच्या दुखापतींचं सत्र थांबेना! क्रिकेट कारकिर्दीला लागणार ब्रेक? वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाची चिंता वाढली?

जन्मभरासाठीच्या बंदीची शिफारस; स्पर्धा संपल्यानंतर होणार अंतिम कायदेशीर कारवाई
या गंभीर प्रकरणात भारतीय क्रीडा पथकाचे शेफ डी मिशन (Chef de Mission) यांनी संबंधित खेळाडूविरुद्ध सर्वात कठोर शिस्तभंगाची कारवाई करत त्याच्यावर जन्मभर बंदी घालण्याची शिफारस केली आहे. सध्या त्या खेळाडूला जपानमधून भारतात परत पाठवण्यात आले असून, आशियाई पॅरा स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर प्रचलित नियम आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार योग्य त्या सक्षम प्राधिकरणांकडून पुढील कठोर पावले उचलली जातील, असेही पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाने जारी केलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

2018 च्या आशियाई पॅरा खेळांमधील सुवर्णपदक विजेता; स्पर्धेत उतरण्यापूर्वीच..
मोहम्मद शम्स आलम शेख याने 2018 मधील आशियाई पॅरा खेळांमध्ये 50m आणि 200m ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. याशिवाय तो 100m बटरफ्लाय (S5) आणि 50m ब्रेस्टस्ट्रोक (SB4) प्रकारात माजी जगज्जेता राहिला आहे. चालू असलेल्या आशियाई पॅरा स्पर्धेत तो आपल्या पहिल्या शर्यतीत उतरण्यापूर्वीच या गंभीर आरोपामुळे अडचणीत सापडला असून, आता त्याचे संपूर्ण क्रीडा कारकीर्द संपुष्टात येण्याची आणि आजीवन बंदीची टांगती तलवार त्याच्यावर निर्माण झाली आहे.

हेही वाचा – भारत विरुद्ध झिम्बाब्वे टी-20 सामन्यात विजय पण हरमनप्रीत माईक फेकून ढसाढसा रडली, व्हिडिओ व्हायरल

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version