‘रायझिंग स्टार्स आशिया कप’साठी भारतीय संघाची घोषणा; वैभव सूर्यवंशीला संधी, तर तिलक वर्मावर मोठी जबाबदारी

या संघातील सर्वात महत्त्वाचे आणि मोठे आकर्षण म्हणजे अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा झालेला समावेश. वैभवने अलीकडच्या काळात आपल्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले आहे.

‘रायझिंग स्टार्स आशिया कप’साठी भारतीय संघाची घोषणा; वैभव सूर्यवंशीला संधी, तर तिलक वर्मावर मोठी जबाबदारी
Tilak Varma, Vaibhav Suryavanshi

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) निवड समितीने आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) ‘रायझिंग स्टार्स’ आशिया कप 2026 या आगामी स्पर्धेसाठी 15 सदस्यीय ‘इंडिया ए’ (India ‘A’) संघाची अधिकृत घोषणा केली आहे. ही मानाची टी-20 स्पर्धा 19 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत कतारची राजधानी दोहा येथे पार पडणार आहे. देशातील युवा आणि गुणवान क्रिकेटपटूंसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची ही सुवर्णसंधी मानली जात आहे. या संघाच्या कर्णधारपदाची धुरा आक्रमक फलंदाज तिलक वर्मा याच्याकडे सोपवण्यात आली असून, अनुभवी रजत पाटीदार उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.

15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीवर नजरा

या संघातील सर्वात महत्त्वाचे आणि मोठे आकर्षण म्हणजे अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा झालेला समावेश. वैभवने अलीकडच्या काळात आपल्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत मिळालेल्या संधीचे सोने करत त्याने आपली क्षमता सिद्ध केली होती. याशिवाय संघात आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), वेगवान गोलंदाज हर्षित राणा, प्रिन्स यादव आणि मुंबईचा ऑलराऊंडर तनुष कोटियन यांसारख्या स्टार खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.

22 नोव्हेंबर रोजी रंगणार महामुकाबला

स्पर्धेच्या आराखड्यानुसार ‘इंडिया ए’ संघाचा ‘गट ब’ (Group B) मध्ये समावेश करण्यात आला असून, त्यात पाकिस्तान ‘ए’, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि नेपाळ हे संघ आहेत. तर ‘गट अ’ मध्ये बांगलादेश ‘ए’, श्रीलंका ‘ए’, अफगाणिस्तान ‘ए’ आणि हाँगकाँगचा समावेश आहे. भारतीय संघ 20 नोव्हेंबर रोजी नेपाळविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. यानंतर रविवारी, 22 नोव्हेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज आणि रोमांचक सामना वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल. 24 नोव्हेंबरला भारताचा युएईविरुद्ध शेवटचा साखळी सामना होईल.

हेही वाचा – टी-20 मालिका 3-2 ने जिंकली, तरी शेवट निराशाजनक! न्यूझीलंडचा दमदार कमबॅक; Men in Blue चे नेमके चुकले कुठे?

उपांत्य फेरी आणि महाअंतिम सामन्याचे वेळापत्रक

दोन्ही गटांतील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीत धडक मारतील, जे सामने 26 आणि 27 नोव्हेंबर रोजी खेळवले जाणार आहेत. तर या स्पर्धेचा महाअंतिम सामना रविवार, 29 नोव्हेंबर रोजी रंगणार आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number