36 वर्षांच्या भुवनेश्वरला संधी, रणजीत 7 विकेट्स घेऊन कहर करणाऱ्या 33 वर्षीय खेळाडूला डावलले!

क्रिकेटविश्वात नव्या चेहऱ्यांना संधी मिळते, वैभव सूर्यवंशी सारखी नावे रणजीतून झळकतात. पण अनेकदा उत्तम फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंना डावलल्याचा आरोप चाहत्यांकडून होतो.

36 वर्षांच्या भुवनेश्वरला संधी, रणजीत 7 विकेट्स घेऊन कहर करणाऱ्या 33 वर्षीय खेळाडूला डावलले!

क्रिकेटविश्वात नव्या चेहऱ्यांना संधी मिळते, वैभव सूर्यवंशी सारखी नावे रणजीतून झळकतात. पण अनेकदा उत्तम फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंना डावलल्याचा आरोप चाहत्यांकडून होतो. अशीच एक बातमी आता समोर आली आहे.

टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात 5 वनडे, 5 टी-20 आणि 3 टेस्ट सामन्यांची सीरिज होणार आहे. या दौऱ्यासाठी सिलेक्टर्सने 36 वर्षांच्या भुवनेश्वर कुमारला संधी दिली, पण 33 वर्षांच्या स्टार बॉलरला मात्र डावलले आणि मग त्याने राग बॉलवर काढला!

हेही वाचा – दीप्ती शर्माने घडवला इतिहास! ‘ही’ उल्लेखनिय कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय महिला क्रिकेटर

गौतम गंभीरच्या कार्यकाळात फक्त एकच टेस्ट खेळण्याची संधी मिळालेल्या या 33 वर्षीय बॉलरने आपला सगळा राग मैदानात काढला. समोरच्या टीमला फक्त 99 धावांवर ऑलआऊट करत 7 विकेट्सचा कहर केला. हा खेळाडू दुसरा-तिसरा कोणी नसून मध्य प्रदेशचा स्पिनर सारांश जैन आहे.

रणजी ट्रॉफीमध्ये बिहारविरुद्ध खेळताना सारांशने कहर केला. त्याने 13 ओव्हरमध्ये फक्त 40 रन देत बिहारच्या 7 महत्त्वाच्या विकेट्स पटकावल्या आणि एकट्याने बिहारला गुडघ्यावर आणले. दुसऱ्या बाजूने आवेश खानने 2 आणि कुमार कार्तिकेयने 1 विकेट घेतल्याने सारांशची 10 विकेट्सची संधी हुकली.

सारांशने श्रीलंकेविरुद्ध टेस्ट डेब्यू करताना 3 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर आता टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध टेस्ट सीरिज खेळणार आहे. मात्र, या मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात सारांश जैनला स्थान मिळालेले नाही.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर-

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number