Monday, November 17, 2025 12:03:24 AM

IND vs AUS: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला विश्वचषक उपांत्य सामना सामना कधी, कुठे आणि मोफत कसा पाहायचा? जाणून घ्या

दोन्ही संघ याआधी लीग टप्प्यात भिडले होते, जिथे ऑस्ट्रेलियाने 3 विकेट्सने विजय मिळवला होता. मात्र, भारतीय संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि ऑस्ट्रेलियाला कडवी टक्कर देण्यास सज्ज आहे.

ind vs aus भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला विश्वचषक उपांत्य सामना सामना कधी कुठे आणि मोफत कसा पाहायचा जाणून घ्या

IND vs AUS: महिला विश्वचषक 2025 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील रोमांचक उपांत्य सामना 30 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. दोन्ही संघ याआधी लीग टप्प्यात भिडले होते, जिथे ऑस्ट्रेलियाने 3 विकेट्सने विजय मिळवला होता. मात्र, भारतीय संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि ऑस्ट्रेलियाला कडवी टक्कर देण्यास सज्ज आहे.

थेट प्रक्षेपण आणि मोफत सामना पाहण्याची सुविधा 

हा सामना भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल. तसेच, जिओ हॉटस्टार अॅपवर चाहत्यांना सामना ऑनलाइन पाहता येईल. ज्यांना मोफत पाहायचे आहे ते डीडी स्पोर्ट्सवर थेट प्रक्षेपणाचा आनंद घेऊ शकतात. महिला विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात यापूर्वी दोन वेळा उपांत्य सामने झाले असून, दोन्ही संघांनी प्रत्येकी एकदा विजय मिळवला आहे. 2017 मध्ये हरमनप्रीत कौरच्या शतकामुळे भारताने ऑस्ट्रेलियावर मात केली होती.

हेही वाचा - Shreyas Iyer Health Update: श्रेयस अय्यरची प्रकृती आता स्थिर; हॉस्पिटलमधून केली भावनिक पोस्ट, चाहत्यांना दिला दिलासा

एकदिवसीय सामन्यांतील आकडेवारी:

आजवर दोन्ही संघांमध्ये 60 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी ऑस्ट्रेलियाने 49 तर भारताने 11 सामने जिंकले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा असला तरी भारतीय संघाची लढण्याची तयारी जबरदस्त आहे.

हेही वाचा - IND vs AUS 1st T20: भारत-ऑस्ट्रेलिया पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द; आता मेलबर्नमध्ये भिडणार संघ

भारत महिला संघ - 
शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, उमा छेत्री (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, राधा यादव, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर, स्नेह राणा, अरुंधती रेड्डी, रिचा घोष, क्रांती गौर.

ऑस्ट्रेलिया महिला संघ - 
जॉर्जिया वॉल, फोबे लिचफिल्ड, एलिस पेरी, बेथ मुनी (यष्टीरक्षक), अ‍ॅनाबेल सदरलँड, अ‍ॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), जॉर्जिया वेअरहॅम, अलाना किंग, किम गार्थ, मेगन शट, हीथर ग्राहम, डार्सी ब्राउन, अ‍ॅलिसा हीली, सोफी मोलिनेक्स.


सम्बन्धित सामग्री