भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढवणारी ‘INS सूर्य’ लॉन्च; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते स्वदेशी फ्लीट सपोर्ट शिपचे अनावरण

INS सूर्य ही पूर्णपणे स्वदेशी डिझाईनवर आधारित सपोर्ट शिप समुद्रातच युद्धनौकांना इंधन पुरवठा, अन्नधान्य व दारूगोळा पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम करेल.

भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढवणारी ‘INS सूर्य’ लॉन्च; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते स्वदेशी फ्लीट सपोर्ट शिपचे अनावरण
Indian navy

INS Surya Indian Navy Launch: भारतीय नौदलाची सागरी क्षमता आणि दूरवरच्या मोहिमा आखण्याची ताकद अनेक पटींनी वाढवणारी पहिली स्वदेशी फ्लीट सपोर्ट शिप (FSS-1) ‘INS सूर्य’ अखेर नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. 6 ऑक्टोबर 2026 रोजी विशाखापट्टणम येथील ‘हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड’ (HSL) मध्ये आयोजित विशेष कार्यक्रमादरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी INS सूर्यचे अधिकृत अनावरण केले. यासोबतच त्यांनी अपग्रेडेड स्लिपवे-4 आणि 300 टन क्षमतेच्या गोलियथ क्रेनचेही उद्घाटन केले. स्वदेशी जहाज निर्मिती आणि नौदलाच्या आत्मनिर्भरतेच्या वाटचालीतील हे अत्यंत मोलाचे पाऊल मानले जात आहे.

खोल समुद्रातील युद्धनौकांसाठी ‘गेम चेंजर’ ठरणार INS सूर्य
हिंद महासागर क्षेत्रात दीर्घकाळ चालणाऱ्या सागरी मोहिमांदरम्यान भारतीय युद्धनौकांना सातत्याने इंधन, रसद आणि तांत्रिक देखभालीची आवश्यकता असते. INS सूर्य ही पूर्णपणे स्वदेशी डिझाईनवर आधारित सपोर्ट शिप समुद्रातच युद्धनौकांना इंधन पुरवठा, अन्नधान्य व दारूगोळा पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम करेल. या जहाजात अद्ययावत कार्गो आणि फ्युएल स्टोरेज, ऑनबोर्ड मेंटेनन्स वर्कशॉप, मल्टी-रोल हेलिकॉप्टरसाठी भव्य डेक आणि अत्याधुनिक स्वसंरक्षण प्रणाली बसवण्यात आली आहे. यामुळे भारतीय युद्धनौकांना किनाऱ्यावर न परतता महिना न् महिने खोल समुद्रात ऑपरेशन्स चालू ठेवणे शक्य होणार आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीय जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; 11 भारतीय…

देशांतर्गत जहाज निर्मिती आणि आत्मनिर्भरतेवर भर
कार्यक्रमादरम्यान बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 1948 मध्ये विशाखापट्टणम येथे तयार झालेल्या स्वतंत्र भारताच्या ‘उषा’ या पहिल्या जहाजाच्या आठवणीला उजाळा दिला. गेल्या आठ दशकांपासून देशाच्या संरक्षण गरजा पूर्ण करणाऱ्या हिंदुस्तान शिपयार्डच्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले. ‘आत्मनिर्भरता ही पहिली पायरी असून जागतिक स्पर्धा ही पुढची पायरी आहे,’ असे सांगत भारतीय शिपयार्ड्सने जागतिक स्तरावर गुणवत्ता, खर्च, तंत्रज्ञान आणि वेळेवर डिलिव्हरीच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.

सागरी क्षेत्राच्या विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
केवळ नौदल किंवा एका शिपयार्डमुळे भारताची सागरी ताकद वाढू शकत नाही, तर नौसेना, डीआरडीओ, एमएसएमई (MSME), खाजगी उद्योग आणि स्टार्टअप्सनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे, असे संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले. विशाखापट्टणमला देशाचे प्रमुख सागरी औद्योगिक केंद्र बनवण्याचे आवाहन करताना त्यांनी ‘उत्कृष्ट डिझाईन, जलद निर्मिती, वेळेवर डिलिव्हरी आणि उत्तम देखभाल’ या चतुःसूत्रीवर भर दिला. गेल्या दशकात संरक्षण उत्पादन क्षेत्रात झालेल्या मोठ्या क्रांतीमुळे भारत आता स्वदेशी डिझाईन आणि निर्मितीच्या बाबतीत जगाचे नेतृत्व करत आहे.

हेही वाचा – विमान प्रवास पुन्हा महागला! इंडिगोकडून फ्युएल सरचार्जमध्ये वाढ; मात्र, या प्रवाशांना दिलासा

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number