महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आता एसटी प्रवासात सवलत मिळवण्यासाठी NCMC कार्ड हे बंधनकारक करण्यात आलेले आहे. मात्र, हे कार्ड मिळवण्यासाठी उशीर होत असल्याने बऱ्याच प्रवाशांना अडचणी येत होत्या. हीच अडचण आता लक्षात घेता एसटी महामंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे.
सवलतीच्या प्रवासाबाबत नवा नियम
मिळालेल्या माहितीनुसार, आता NCMC कार्डसाठी अर्ज केल्यानंतर मिळणारी क्युआर कोड असलेली पावती ही तब्बल 30 दिवसांपर्यंत वैध मानली जाणार आहे. याच पावतीच्या आधारे प्रवाशांना सवलतीते असलेले तिकीट मिळेल. नव्या नियमानुसार, NCMC कार्डसाठी नोंदणी केल्यानंतर प्रवाशाला क्युआर कोडची पावती ही दिली जाईल. कंडक्टरकडील ई-तिकीट मशीनवर हा कोड स्कॅन करुन सवलत देता येणार आहे. हीच पावती नोंदणीच्या तारखेपासून 30 दिवसच ग्राह्य असणार आहे.
हेही वाचा – शाळांना उन्हाळी सुट्टी कधीपासून? 43 दिवसांचं वेळापत्रक जाहीर, तारीख जाणून घ्या
महत्त्वाचे म्हणजे, या कालावधीमध्ये प्रवाशांनी त्यांच्याकडे असलेले स्मार्ट कार्ड घेऊन ते सक्रिय करणे तसेच रिचार्च करणे ही आवश्यक असणार आहे. पुणे विभागामध्ये लाखो प्रवाशांनी NCMC या कार्डसाठी नोंदणी केली असून मोठ्या प्रमाणात NCMC कार्डचे वाटपही झालेले आहे.
एसटी कार्ड आता घरबसल्या रिचार्ज करा
एवढेच नाही तर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी भीम या अॅपद्वारे घरबसल्या कार्ड रिचार्च ही करण्याची सुविधा आहे.
कार्ड रिचार्जसाठी प्रवाशांना वारंवार केंद्रावर जाण्याची गरज नाही. त्यामुळे पात्र प्रवाशांनी लवकरात लवकर नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर
विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान | Maharashtra Election