सणासुदीत प्रवाशांना दिलासा! एसटी महामंडळाचा मोठा निर्णय; बससेवेत वाढ, जाणून घ्या कोणत्या मार्गांवर..

दसरा आणि दिवाळी या सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे.

सणासुदीत प्रवाशांना दिलासा! एसटी महामंडळाचा मोठा निर्णय; बससेवेत वाढ, जाणून घ्या कोणत्या मार्गांवर..

दसरा आणि दिवाळी या सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. या काळात प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये, यासाठी महामंडळाने चार प्रमुख लांब पल्ल्याच्या मार्गांवर जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे.

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, पुणे, नागपूर, मुंबई आणि नाशिक या चार मार्गांवर एकूण 91 जादा बस सोडण्यात येणार आहेत. सध्या या चार मार्गांवर नियमितपणे 184 बस धावत आहेत. जादा बसच्या नियोजनानंतर ही संख्या 275 वर जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना सहजपणे जागा मिळणार असून, त्यांची सणासुदीत धावपळ कमी होणार आहे.

हेही वाचा – पुण्यात म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केला?, 4462 घरांच्या सोडतीबाबत समोर आली महत्त्वाची अपडेट; जाणून घ्या लगेच

मार्गनिहाय नियोजन असे आहे:

सर्वाधिक मागणी असलेल्या पुणे मार्गावर सर्वाधिक 50 जादा बस सोडण्यात येणार आहेत. नोकरी, शिक्षण आणि व्यवसायानिमित्त पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानंतर नागपूर मार्गावर 30 जादा बस वाढवण्यात आल्या आहेत. विदर्भाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही मोठी सोय ठरणार आहे.

मुंबई मार्गासाठी 6 आणि नाशिक मार्गासाठी 5 जादा बसचे नियोजन महामंडळाने केले आहे.

दरवर्षी दसरा-दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जाते. तिकीट दर दुप्पट-तिप्पट आकारले जातात. ही लूट थांबवण्यासाठी आणि सर्वसामान्य प्रवाशांना परवडणाऱ्या दरात, सुरक्षित प्रवास घडवण्यासाठी एसटी महामंडळाने हे पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे प्रवाशांनी एसटीच्या अधिकृत तिकीट खिडकीवरून किंवा ऑनलाईन आरक्षण करून प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number