सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार; पुण्यात CNG च्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ

घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या वाढीपाठोपाठ आता सीएनजी इंधनाच्या दरातही थेट 2 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. दसरा आणि नवरात्रीसारखे प्रमुख सण अवघ्या काही दिवसांवर आले असतानाच ही दरवाढ जाहीर झाल्याने नागरिकांच्या सणासुदीच्या बजेटवर मोठा ताण पडणार आहे.

सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार; पुण्यात CNG च्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ
Pune CNG price hike 2 rupees

पुणे आणि आसपासच्या परिसरातील वाहनचालकांसह सर्वसामान्यांसाठी एक मनस्ताप देणारी बातमी समोर आली आहे. घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या वाढीपाठोपाठ आता सीएनजी इंधनाच्या दरातही थेट 2 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. दसरा आणि नवरात्रीसारखे प्रमुख सण अवघ्या काही दिवसांवर आले असतानाच ही दरवाढ जाहीर झाल्याने नागरिकांच्या सणासुदीच्या बजेटवर मोठा ताण पडणार आहे. 6 ऑक्टोबर 2026 च्या मध्यरात्रीपासून, म्हणजेच 7 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 12 वाजल्यापासून ही नवीन दरवाढ अमलात येणार आहे.

सीएनजीचा दर आता 100 रुपयांच्या पार

या ताज्या दरवाढीनंतर पुण्यात सीएनजीचा सुधारित दर आता 100.50 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. आधीच 1 ऑक्टोबर रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडर महागल्यामुळे व्यापारी वर्ग चिंतेत होता, त्यातच आता इंधन महागल्याने दुहेरी फटका बसला आहे. या निर्णयामुळे दररोज सीएनजीवर वाहने चालवणारे हजारो नागरिक, रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांच्या खिशावर मोठा आर्थिक भार पडणार आहे. इंधनाचे दर वाढल्यामुळे आगामी काळात ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यातही वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा – 48 तासांत राज्यात चौथी भीषण आगीची घटना! पंढरपुरात अग्नितांडव; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

इलेक्ट्रॉनिक वस्तूही महागण्याची शक्यता; महागाईची लाट कायम

सीएनजी आणि गॅस सिलिंडरच्या दरातील या सलग वाढीमुळे वाहतूक खर्च वाढून दैनंदिन सेवांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे. केवळ इंधनच नव्हे, तर आगामी काळात टीव्ही, एसी आणि फ्रीज यांसारख्या आवश्यक इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता विविध स्तरांतून व्यक्त केली जात आहे. एकीकडे सणांचा उत्साह असताना दुसरीकडे वाढत्या महागाईमुळे पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबे आणि सर्वसामान्य नागरिक चिंतेत सापडले आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number