लंडनमध्ये मराठीचा डंका! 14 वर्षांचा फोटोग्राफीचा प्रवास थेट ऑस्करपर्यंत; मराठीतून भाषण देणारा फोटोग्राफर कोण?

लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियमने आयोजित केलेल्या जगप्रसिद्ध 'वाइल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर' या स्पर्धेत महाराष्ट्राच्या लेकराने बाजी मारली आहे.

लंडनमध्ये मराठीचा डंका! 14 वर्षांचा फोटोग्राफीचा प्रवास थेट ऑस्करपर्यंत; मराठीतून भाषण देणारा फोटोग्राफर कोण?

लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियमने आयोजित केलेल्या जगप्रसिद्ध ‘वाइल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर’ या स्पर्धेत महाराष्ट्राच्या लेकराने बाजी मारली आहे. वन्यजीव छायाचित्रण क्षेत्रातील ऑस्कर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठित स्पर्धेत बदलापूरचे सुपुत्र सिताराम राऊळ यांनी श्रेणी विजेतेपद पटकावले आहे.

या स्पर्धेसाठी जगभरातून 59 हजारांहून अधिक छायाचित्रे आली होती, त्यामधून त्यांच्या छायाचित्राची निवड करण्यात आली. त्यांना ‘Invertebrates: Behaviour’ म्हणजेच ‘अपृष्ठवंशीय प्राण्यांचे वर्तन’ या गटात हा पुरस्कार मिळाला आहे.

त्यांच्या पुरस्कारप्राप्त फोबद्दल –

सिताराम यांनी टिपलेले ‘Shifting Sands’ नावाचे हे छायाचित्र राजस्थानमधील थार वाळवंटातील आहे. जैसलमेर येथे टिपलेल्या या छायाचित्रात एक विंचू स्वतःच्या निवाऱ्यासाठी वाळूत खड्डा खोदताना दिसत आहे. वाळवंटासारख्या कठीण परिस्थितीतही लहानात लहान जीव जगण्यासाठी कसा संघर्ष करतो, हेच या छायाचित्रातून अधोरेखित होते. मॅक्रो फोटोग्राफीच्या माध्यमातून निसर्गातील लहान जीवांच्या हालचाली जवळून कॅप्चर करत, निसर्गाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

मराठीतून भाषण –

लंडनमध्ये हा पुरस्कार मिळाल्यानंतर सिताराम राऊळ यांनी आपले संपूर्ण भाषण मराठीतून केले. ते म्हणाले, “भारतात मी ज्या-ज्या ठिकाणी फिरलो, तिथली सर्व माणसं प्रेमळ आणि पाहुण्यांचा आदरातिथ्य करणारी होती. हा मला मिळालेला पुरस्कार तुमच्यामुळेच शक्य झाला आहे.”

View this post on Instagram
  A post shared by Sitaram Raul (@shawshaank_)

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number