आजच्या काळात आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही दोन कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची आहेत. बँकेचे व्यवहार असो वा सरकारी योजना, या दोन्हींशिवाय एकही काम पूर्ण होत नाही. पण एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे आधार आणि पॅन कार्ड आपोआप बंक होते का? असंख्य लोकांना याबाबत माहिती नाही, ज्यामुळे मोठा गैरवापर होण्याची शक्यता असते.
मृत्यूनंतर आधार कार्ड बंद होतं का?
खरं तर या बाबत एक महत्त्वाचा नियम आहे, जो की, व्यक्तीच्या मृ्त्यूनंतर आधार कार्ड आपोआप रद्द होत नाही. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणकडून याबाबक अशी कोणतीही स्वयंचलित प्रक्रिया नाही, त्यामुळेच मृत व्यक्तीचा आधार क्रमांक अॅक्टिव्हच राहतो. अशा परिस्थितीमध्ये त्याचा गैरवापर होऊ शकतो, त्यामुळे मृताच्या कुटुंबीयांनी त्याची खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण पॅन कार्डबाबतही नियम वेगळे आहेत.
हेही वाचा-मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीचा महागणार; मीटरचे नवे दर किती?; जाणून घ्या सविस्तर
आधार आणि पॅन बंद कसा करावा?
आधार कार्ड औपचारिकरित्या बंद करण्याची थेट सुविधा मिळत नाही. मात्र, पाहिलं तर कुटुंबीयांनी मृत्यू प्रमाणपत्र घेत जवळच्या आधार केंद्रात जात बायोमेट्रित लॉक करण्याची विनंती करावी लागते, जेणेकरुन त्याचा भविष्यात होणारा गैरवापर टाळता येईल. शिवाय संबंधित बँक आणि इतर ठिकाणी आधार लिंक काढून घ्यावा.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.