निर्दयी प्रकार! आजीला फरफटत नेत पैसे हिसकावण्याचा प्रयत्न; CCTV मध्ये घटना कैद, व्हिडिओ व्हायरल

छत्रपती संभाजीनगरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका वयोवृद्ध महिलेच्या हातातील पैसे असलेली पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न करताना तिला रस्त्यावर फरफटत नेल्याचा प्रकार समोर आला आहे.
निर्दयी प्रकार! आजीला फरफटत नेत पैसे हिसकावण्याचा प्रयत्न; CCTV मध्ये घटना कैद, व्हिडिओ व्हायरल

छत्रपती संभाजीनगरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका वयोवृद्ध महिलेच्या हातातील पैसे असलेली पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न करताना तिला रस्त्यावर फरफटत नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा CCTV व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वृद्ध महिलेच्या पिशवीत महिन्याच्या खर्चासाठी मिळालेली 4 हजार रुपयांची पेन्शन होती. लाल रंगाचा टी-शर्ट घातलेला एक तरुण मागून येतो आणि तिच्या हातातील पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न करतो. मात्र, पैसे वाचवण्यासाठी महिला प्रतिकार करते. या झटापटीत ती रस्त्यावर पडते. त्यानंतर तरुण पिशवी हिसकावून तेथून पळून जातो.

या घटनेत वृद्ध महिला रस्त्यावर पडल्याने जखमी झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ती मदतीसाठी आजूबाजूच्या लोकांना साद घालत असल्याचेही दिसते. दरम्यान, स्थानिकांनी संबंधित तरुणाला पकडून आणल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – दूध तापवलं अन् चक्क रबरासारखा गोळा तयार झाला; मालेगावमधील धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल

या संपूर्ण प्रकाराचे दृश्य परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहे. वयोवृद्ध महिलेबाबत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर-

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version