Nepal Flights Halted: दिल्लीनंतर नेपाळमध्येही विमान वाहतुकीत गोंधळ! काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाडामुळे सर्व उड्डाणे थांबली

धावपट्टीवरील दिव्यांमध्ये (Runway Lights) आलेल्या बिघाडामुळे सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात आली आहेत.<br/>

Nepal Flights Halted: दिल्लीनंतर नेपाळमध्येही विमान वाहतुकीत गोंधळ! काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाडामुळे सर्व उड्डाणे थांबली

Nepal Flights Halted: दिल्ली विमानतळावरील तांत्रिक बिघाडाची समस्या संपताच नेपाळमधील काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरही तांत्रिक अडथळा निर्माण झाला आहे. धावपट्टीवरील दिव्यांमध्ये (Runway Lights) आलेल्या बिघाडामुळे सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात आली आहेत.

धावपट्टीवरील दिवे बंद 

दरम्यान, शनिवारी सायंकाळी सुमारे 5:30 वाजता (स्थानिक वेळेनुसार) त्रिभुवन विमानतळाच्या धावपट्टीवरील एअरफील्ड लाइटिंग सिस्टम बंद पडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लगेच विमानतळ प्रशासनाने सर्व उड्डाणे थांबवण्याचा निर्णय घेतला. विमानतळाचे प्रवक्ते रेंजी शेर्पा यांनी एएनआयला सांगितले की, धावपट्टीवरील प्रकाशयोजनेत तांत्रिक बिघाड झाला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव सर्व उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. 

हेही वाचा – Ahmedabad Plane Crash : ‘वैमानिकांचा दोष नाही!’ सर्वोच्च न्यायालयाने कॅप्टन सुमीत सभरवाल यांच्या वडिलांचं भावनिक सांत्वन करत दिला धीर

तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल  

विमानतळ प्रशासनाने तत्काळ तांत्रिक पथकांना घटनास्थळी तैनात केलं असून, समस्या शोधण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, उड्डाणे शक्य तितक्या लवकर पुन्हा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा – Bihar Election 2025: समस्तीपूरमध्ये कचऱ्यात सापडल्या हजारो VVPAT स्लिप्स; 2 अधिकारी निलंबित, FIR दाखल

नेपाळचे मुख्य विमानतळ ठप्प

काठमांडूचे त्रिभुवन विमानतळ हे नेपाळचे सर्वात मोठे आणि प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. येथून देशातील बहुतांश हवाई वाहतूक हाताळली जाते. त्यामुळे या बिघाडामुळे संपूर्ण देशातील हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, याच आठवड्यात दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर देखील मोठा तांत्रिक बिघाड झाला होता. AMSS या अत्यावश्यक संप्रेषण प्रणालीतील बिघाडामुळे संपूर्ण देशातील उड्डाण व्यवस्था विस्कळीत झाली होती. ही समस्या आता सोडवली गेली असली तरी, लगेचच काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड झाल्याने विमान प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number