Thursday, November 13, 2025 08:32:49 AM

Afghanistan Stop Pakistan Water Supply: भारतानंतर आता अफगाणिस्तान देखील अडवणार पाकिस्तानेच पाणी; कुनार नदीवर बांधण्यात येणार धरण

तालिबान सरकारने पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या कुनार नदीवर धरण बांधण्याचा निर्णय घेतला असून, या प्रकल्पामुळे पाकिस्तानमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ शकते.

afghanistan stop pakistan water supply भारतानंतर आता अफगाणिस्तान देखील अडवणार पाकिस्तानेच पाणी कुनार नदीवर बांधण्यात येणार धरण

Afghanistan Stop Pakistan Water Supply: भारताने सिंधू नदी करार स्थगित केल्यानंतर आता अफगाणिस्ताननेही पाकिस्तानविरुद्ध दबाव आणण्याची तयारी केली आहे. तालिबान सरकारने पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या कुनार नदीवर धरण बांधण्याचा निर्णय घेतला असून, या प्रकल्पामुळे पाकिस्तानमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. तालिबानचे उप-माहिती मंत्री मुजाहिद फराही यांनी सांगितले की, पाणी आणि ऊर्जा मंत्रालयाला तालिबानचे सर्वोच्च नेते शेख हिबतुल्ला अखुंदजादा यांनी कुनार नदीवर धरण उभारण्याचे निर्देश दिले आहेत. हा निर्णय दोन्ही देशांतील अलीकडील सीमावाद आणि संघर्षानंतर घेतला गेला आहे, ज्यात दोन्ही बाजूंचे डझनभर लोक मृत्युमुखी पडले होते.

फराही यांनी स्पष्ट केले की, तालिबान नेतृत्वाने या प्रकल्पासाठी परदेशी कंपन्यांची वाट न पाहता देशातील स्थानिक कंपन्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. पाणी आणि ऊर्जा मंत्री मुल्ला अब्दुल लतीफ मन्सूर यांनीही या निर्णयाचं स्वागत करत म्हटलं, अफगाणिस्तानला त्यांच्या स्वतःच्या जलसंपत्तीचं व्यवस्थापन आणि वापर करण्याचा पूर्ण अधिकार आहे.

हेही वाचा - Putin Warning To America: अमेरिकेच्या टॉमहॉक मिसाइल निर्णयावर पुतिन संतापले; अमेरिकाला दिला थेट हा इशारा...

पाकिस्तानसाठी ‘दुहेरी धक्का’

या निर्णयामुळे पाकिस्तानवर दुहेरी दबाव आला आहे. कारण भारताने आधीच सिंधू नदी करार थांबवला आहे, आणि आता अफगाणिस्ताननेही पाणी अडवण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तान दोन आघाड्यांवरील जलयुद्धाला सामोरे जाईल. तज्ञांच्या मते, पाकिस्तानच्या सिंचनव्यवस्थेवर आणि शेती उत्पादनावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा - Shashi Tharoor On Trump: डोनाल्ड ट्रम्पच्या तेल खरेदी विधानावर शशी थरूर यांचा पलटवार; म्हणाले, 'भारत स्वतःचे निर्णय घेईल'

दरम्यान, लंडनस्थित अफगाण पत्रकार सामी युसुफझाई यांनी या निर्णयावर भाष्य करताना म्हटलं की, भारतापाठोपाठ पाकिस्तानचा पाणीपुरवठा रोखण्याची पाळी आता अफगाणिस्तानवर आली आहे. त्यांच्या मते, तालिबान सर्वोच्च नेत्याने देशांतर्गत कंपन्यांसोबत करार करून काम तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. 2021 मध्ये सत्तेवर आल्यानंतर तालिबानने जलसंपत्ती स्वावलंबनाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. ऊर्जा निर्मिती, सिंचन आणि परकीय अवलंबित्व कमी करण्यासाठी अनेक नवीन धरण प्रकल्प आणि जलविद्युत प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानदरम्यान कोणताही औपचारिक पाणीवाटप करार अस्तित्वात नाही, यामुळे इस्लामाबादने या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे.

भारत-अफगाणिस्तान मैत्री अधिक मजबूत

या पार्श्वभूमीवर भारत आणि अफगाणिस्तानचे संबंध अधिक दृढ झाले आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्या दिल्ली भेटीनंतर दोन्ही देशांनी एकत्रित निवेदन जारी केले, ज्यात भारताच्या मदतीने बांधलेल्या भारत-अफगाण मैत्री धरण (सलमा धरण) प्रकल्पाचा उल्लेख करण्यात आला. भारतीय मदतीने 2016 मध्ये पूर्ण झालेल्या या प्रकल्पामुळे अफगाणिस्तानमध्ये 42 मेगावॅट वीज निर्मिती होते आणि सुमारे 75 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे.

कुनार नदी अफगाणिस्तानातील हिंदूकुश पर्वतरांगांमधून उगम पावते आणि सुमारे 480 किलोमीटर वाहत राहते. नंतर ती काबूल नदीला मिळते आणि पाकिस्तानमध्ये प्रवेश करते, जिथे तिला चित्राल नदी म्हणून ओळखले जाते. या नदीवर धरण बांधल्यास पाकिस्तानच्या खालच्या भागातील जलपुरवठा मोठ्या प्रमाणावर प्रभावित होऊ शकतो.
 


सम्बन्धित सामग्री