Tuesday, November 18, 2025 03:28:33 AM

Shashi Tharoor On Trump: डोनाल्ड ट्रम्पच्या तेल खरेदी विधानावर शशी थरूर यांचा पलटवार; म्हणाले, 'भारत स्वतःचे निर्णय घेईल'

थरूर यांनी म्हटलं आहे की, 'ट्रम्प यांनी भारताचे निर्णय जाहीर करणे योग्य नाही. भारत स्वतःचे निर्णय घेईल आणि जगाला ते कळवेल.

shashi tharoor on trump डोनाल्ड ट्रम्पच्या तेल खरेदी विधानावर शशी थरूर यांचा पलटवार म्हणाले भारत स्वतःचे निर्णय घेईल

Shashi Tharoor On Trump: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल, असं विधान केलं होत. आता यावर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. थरूर यांनी म्हटलं आहे की, 'ट्रम्प यांनी भारताचे निर्णय जाहीर करणे योग्य नाही. भारत स्वतःचे निर्णय घेईल आणि जगाला ते कळवेल. आम्ही त्यांना सांगत नाही की त्यांनी काय करावे, तसेच त्यांनी भारताला हे सांगण्याचा अधिकार नाही.' 

शशी थरूर यांचे हे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात मंगळवारी झालेल्या फोन संवादानंतर आले. या संभाषणादरम्यान मुख्यत्वे व्यापार आणि आर्थिक संबंधांवर चर्चा झाली, कारण अमेरिकेने भारतीय वस्तूंवर 50 टक्के अधिक कर लादल्याने दोन देशांमधील संबंधांवर ताण निर्माण झाला आहे.

हेही वाचा - India Russia Relations: अमेरिकेसाठी धोक्याची घंटा! भारत-रशिया संबंध आणखी मजबूत, सुरु होणार खास प्रकल्प

व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, 'मोदी आणि मी व्यापारावर चर्चा केली. आम्ही अनेक गोष्टींवर चर्चा करत आहोत. दोन्ही देश खूप रस घेत आहेत. मी पंतप्रधान मोदींशी बोललो, आमचे संबंध खूप चांगले आहेत आणि ते रशियाकडून तेल खरेदी लक्षणीयरीत्या कमी करत आहेत.'

हेही वाचा - Elon Musk On Job Cuts: एलोन मस्क यांचे AI बद्दल मोठं भाकित! नोकर कपातीबद्दलही केलं धक्कादायक विधान

दरम्यान, गेल्या आठवड्यातही ट्रम्प यांनी असा दावा केला होता की पंतप्रधान मोदींनी त्यांना सांगितले आहे की, भारत रशियन तेल खरेदी थांबवेल. परंतु भारत सरकारने स्पष्ट केले की अशा कोणत्याही चर्चेची नोंद नाही. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ट्रम्प यांचे आभार मानत लिहिले, 'तुमच्या फोन कॉलबद्दल आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छांबद्दल धन्यवाद. प्रकाशाच्या या सणानिमित्त, दोन्ही महान लोकशाही जगासाठी आशेचा किरण बनत राहोत आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध एकजूट राहोत.' तथापी, सरकारच्या अधिकृत निवेदनानुसार, पंतप्रधान मोदींनी भारत-अमेरिका भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला होता. तसेच दहशतवादाविरुद्ध आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यास भारताची अटळ वचनबद्धता अधोरेखित केली होती. 
 


सम्बन्धित सामग्री