लाल समुद्रात थरार! 14 भारतीयांना घेऊन जाणाऱ्या बोटीवर हल्ला? हुथी बंडखोरांचा सौदी अरेबियावर गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?

येमेनमधील हुथी बंडखोरांनी गुरुवारी एक खळबळजनक दावा केला आहे की, लाल समुद्रातील झुकार बेटाच्या परिसरात 14 भारतीय सदस्यांना घेऊन जाणाऱ्या एका बोटीला लक्ष करण्यात आले आहे.

लाल समुद्रात थरार! 14 भारतीयांना घेऊन जाणाऱ्या बोटीवर हल्ला? हुथी बंडखोरांचा सौदी अरेबियावर गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?
Red Sea Indian boat attack

लाल समुद्रातील सागरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या 14 भारतीय नागरिकांच्या एका बोटीवर संशयास्पद हल्ल्याची मोठी घटना समोर आली आहे. येमेनमधील हुथी बंडखोरांनी गुरुवारी एक खळबळजनक दावा केला आहे की, लाल समुद्रातील झुकार बेटाच्या परिसरात 14 भारतीय सदस्यांना घेऊन जाणाऱ्या एका बोटीला लक्ष करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हुथी गटाने या हल्ल्यामागे सौदी अरेबियाचा हात असल्याचा गंभीर आरोप केला असून, या प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.

सौदी अरेबियावर हल्ल्याचा थेट आरोप

येमेनी सशस्त्र दलांचे अधिकृत प्रवक्ते याह्या सारी यांनी प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक अहवालांच्या हवाल्याने हा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सौदी अरेबियाच्या सैन्याने लाल समुद्रातील झुकार बेटाजवळ या भारतीय बोटीवर जोरदार हल्ला चढवला, ज्यामध्ये बोटीवरील 14 जणांना टार्गेट करण्यात आले. हल्ल्यानंतर येमेनी सशस्त्र दल सध्या या बोटीवरील जखमी व्यक्तींच्या सुटकेसाठी आणि मदतीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले आहे. हुथी बंडखोरांच्या या दाव्यामुळे आखाती देशांमधील राजकीय व सामरिक तणाव पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

हेही वाचा – संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात दाऊदच्या ‘डी-कंपनी’बाबत चुकीचा उल्लेख; भारताने UN ला सुनावले खडेबोल

हुथी बंडखोरांचे जागतिक समुदायाला आवाहन

या कथित हल्ल्यानंतर लाल समुद्रातील आंतरराष्ट्रीय जहाजवाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हुथी प्रवक्त्यांनी असा इशारा दिला आहे की, अशा प्रकारच्या लष्करी कारवायांमुळे समुद्रातून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला आणि जलवाहतुकीला मोठा धोका निर्माण होत आहे. यावर तातडीने नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. तसेच, त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन केले आहे की, त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून सौदी अरेबियाच्या अशा कथित बेजबाबदार कृत्यांना आणि लष्करी हालचालींना त्वरित आळा घालावा. या संपूर्ण प्रकरणामुळे लाल समुद्रातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, यावर भारताकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number