Thursday, November 13, 2025 08:20:28 AM

Britain Sanctions on India : अमेरिकेनंतर आता ब्रिटनचा भारताला मोठा झटका; नायरा एनर्जीवर कठोर निर्बंध!

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, जेणेकरून भारताने रशियाकडून तेलाची खरेदी करू नये. त्यातच आता ब्रिटनने निर्बंध लादत मोठा धक्का दिला आहे.

britain sanctions on india  अमेरिकेनंतर आता ब्रिटनचा भारताला मोठा झटका नायरा एनर्जीवर कठोर निर्बंध

Britain Sanctions on India : जगातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेनंतर आता ब्रिटननेही भारताला मोठा धक्का दिला आहे. ब्रिटनने केलेल्या एका मोठ्या घोषणेमुळे भारताला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करत असल्याचे कारण पुढे करत अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ (कर) लावण्याचा निर्णय घेतला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, जेणेकरून भारताने रशियाकडून तेलाची खरेदी करू नये. अमेरिकेचा असा आरोप आहे की, भारत रशियाकडून तेल विकत घेतो आणि त्या पैशांचा वापर रशिया युक्रेनविरोधातील युद्धाला फंडिंग करण्यासाठी करतो. हे सर्व सुरू असतानाच, आता ब्रिटनने देखील भारताला मोठा धक्का दिला आहे.

ब्रिटन सरकारने बुधवारी एक मोठी कारवाई करत रशियाची तेल कंपनी आणि भारतीय पेट्रोलियम कंपनी नायरा एनर्जी लिमिटेड यांच्यावर 90 नवे प्रतिबंध लादले आहेत. हा भारतासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. ब्रिटनने नायरा एनर्जीवर कारवाई करताना स्पष्ट केले आहे की, या कंपनीने 2024 मध्ये अब्जावधी रुपयांचे कच्चे तेल रशियाकडून आयात केले आहे.

हेही वाचा - Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा; “मोदींनी खात्री दिलीय, भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवेल”

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या फंडिंग स्त्रोतांवर हल्ला करणे, हाच ब्रिटनचा उद्देश आहे. युक्रेन-रशिया युद्धात रशियाला होणारा नफा थांबवणे, हे ब्रिटन सरकारचे मुख्य लक्ष्य असल्याचे सांगण्यात आले आहे. ब्रिटन सरकारने दावा केला आहे की, कच्च्या तेलाच्या विक्रीतून रशिया सध्या युद्धासाठी मोठ्या प्रमाणात निधी उभारत आहे आणि त्यांच्या या पावलामुळे रशियाला होणारी फंडिंग थांबवली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, नायरा एनर्जी कंपनीने 2024 मध्ये तब्बल 5 अब्ज डॉलर किमतीचे 10 कोटी बॅरल तेल एकट्या रशियाकडून आयात केले आहे.

दरम्यान, अमेरिकेने सध्या भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावला आहे आणि वेगवेगळ्या मार्गांनी भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, तरीही भारताने रशियाकडून तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला रशियाकडून तेलाची खरेदी बंद करू असे सांगितले होते. मात्र, यावर भारताकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

हेही वाचा - Countries Without Military: सैन्य नसलेले 5 देश; कोण करतात या जगातील राष्ट्रांचे संरक्षण?


सम्बन्धित सामग्री