Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा; “मोदींनी खात्री दिलीय, भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवेल”

रशियाच्या ऊर्जा उत्पन्नात कपात करण्याच्या ट्रम्प यांच्या राजकीय प्रयत्नांचा एक भाग म्हणून नरेंद्र मोदी यांचे आश्वासन मिळवणे महत्त्वाचे होते, असे ट्रम्प म्हणाले.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा; “मोदींनी खात्री दिलीय, भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवेल”

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच एक मोठा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना खात्री दिली आहे की, भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल. युक्रेनमधील युद्धामुळे रशियाला एकटे पाडण्याच्या ट्रम्प यांच्या प्रयत्नात हे एक मोठे पाऊल ठरेल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

व्हाईट हाऊसमध्ये केला दावा
व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला अशी खात्री दिली आहे की, भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी थांबवेल.” अमेरिकेचे म्हणणे आहे की, भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या युद्ध यंत्रणेला निधी मिळण्यास मदत होत आहे. याच पार्श्वभूमीवर, ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भारताकडून रशियन कच्च्या तेलाच्या सततच्या आयातीबाबत चिंता व्यक्त केली होती.
चीनवरही दबाव: ट्रम्प म्हणाले की, “युक्रेनमधील युद्धावरून रशियाला एकाकी पाडण्याच्या प्रयत्नातील हे एक मोठे पाऊल आहे. आता आम्ही चीनलाही हेच करायला लावणार आहोत.”

हेही वाचा – Donald Trump : ट्रम्पच्या टॅरिफविरोधात भारताला मिळणार स्वित्झर्लंडचा पाठिंबा! नवे व्यापार करार चर्चेत

मोदींसोबत चांगले संबंध
चीनसोबतच्या वाढत्या तणावाच्या काळात भारताला एक विश्वासार्ह भागीदार (Reliable Partner) म्हणून पाहता का, असे विचारले असता डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर दिले की, “ऊर्जा धोरणावरून वाद असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. ते माझे मित्र आहेत.” मात्र, ट्रम्प यांची भारतविरोधी व्यापारी धोरणे आणि मोदींशी चांगले संबंध असल्याचे वारंवार सांगणे यामुळे ट्रम्प यांच्या विक्षिप्तपणाचे आणखी एक उदाहरण पाहायला मिळत आहे.

चीनवर दबाव आणणार
रशियाच्या ऊर्जा उत्पन्नात कपात करण्याच्या ट्रम्प यांच्या राजकीय प्रयत्नांचा एक भाग म्हणून नरेंद्र मोदी यांचे आश्वासन मिळवणे महत्त्वाचे होते, असे ट्रम्प म्हणाले. ते पुढे म्हणाले, “आता आपल्याला चीनलाही हेच करायला लावावे लागेल. गेल्या आठवड्यात मध्य पूर्वेत आपण जे केले, त्याच्या तुलनेत चीनवर दबाव आणणे अधिक सोपे असेल.”

भारताकडून अधिकृत दुजोरा नाही
डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दावा केला असला तरी, भारत रशियन तेल आयात थांबवेल या त्यांच्या दाव्याला भारताने अद्याप अधिकृत दुजोरा (Official Confirmation) दिलेला नाही. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीही अनेकदा भारत-पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबवल्याचे दावे केले होते, मात्र, भारताने त्यांचे ते दावे फेटाळून लावले होते.

हेही वाचा – US Protest 2025: जगावर टॅरिफ लावून स्वतःच्याच देशात भडकवलं आंदोलन; ट्रम्प यांच्या विरोधात लाखो लोक रस्त्यावर

डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच सर्जियो गोर यांची भारतातील अमेरिकेचे राजदूत (Ambassador) म्हणून नियुक्ती केली आहे आणि सर्जियो गोर यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर काही दिवसांतच ट्रम्प यांनी भारताच्या रशियन तेल खरेदीबाबत ही घोषणा केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number