Tuesday, November 18, 2025 03:47:57 AM

Diwali 2025: न्यूझीलंडमध्ये दिवाळीचा जल्लोष! पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी वेलिंग्टनच्या स्वामीनारायण मंदिरात साजरी केली दिवाळी

न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी वेलिंग्टनमधील बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिरात दिवाळी आणि अन्नकूट उत्सवात सहभागी होत भारतीय संस्कृतीचे कौतुक केले.

diwali 2025 न्यूझीलंडमध्ये दिवाळीचा जल्लोष पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी वेलिंग्टनच्या स्वामीनारायण मंदिरात साजरी केली दिवाळी

New Zealand Diwali Celebration: भारताबरोबरच जगभरातील भारतीय समुदाय सध्या दिवाळीच्या उत्साहात न्हाऊन निघाला आहे. अशाच उत्साही वातावरणात न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी वेलिंग्टनमधील बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिरात दिवाळी आणि अन्नकूट उत्सवात सहभागी होत भारतीय संस्कृतीचे कौतुक केले. या कार्यक्रमात शेकडो हिंदू नागरिक, बीएपीएसचे साधू आणि समुदायातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिरात पारंपरिक पोशाख, फुलांची सजावट आणि रंगोळ्यांनी सजलेले वातावरण पाहून लक्सन मंत्रमुग्ध झाले.

मंदिरात पारंपरिक स्वागत आणि आरती

बीएपीएस मंदिरात पंतप्रधान लक्सन यांचे पारंपरिक रीतीने स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी आरतीत सहभाग घेतला आणि समुदायातील लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसोबत संवाद साधला. लक्सन यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून म्हटले की, 'बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिरातील सर्वांचे आभार. तुमचं उबदार स्वागत आणि दिवाळीचा उत्सव अनुभवणं ही माझ्यासाठी अविस्मरणीय संधी आहे. सर्वांना हार्दिक शुभेच्छा!' तथापी, पंतप्रधान लक्सन यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, 'दिवाळीसारखे सण केवळ धार्मिक नाहीत, तर ते विविधता आणि ऐक्याचं प्रतिक आहेत. तरुणांनी या उत्सवात घेतलेला सहभाग पाहून मला अभिमान वाटतो.' 

हेही वाचा - North Korea Launches Ballistic Missile: ट्रम्प यांच्या दक्षिण कोरिया भेटीपूर्वी उत्तर कोरियाने केली बॅलिस्टिक क्षेपणास्त्र चाचणी

अन्नकूट उत्सव म्हणजे काय?

अन्नकूट म्हणजे ‘अन्नाचा डोंगर’. या उत्सवात देवाला विविध खाद्यपदार्थांचा भोग दिला जातो आणि नवीन वर्षाची सुरुवात केली जाते. हा सण एकता, समृद्धी आणि शांततेचा संदेश देणारा मानला जातो. लक्सन यांनीही या प्रसंगी हिंदू परंपरेचा आदर ठेवत कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.

महंत स्वामी महाराजांचा आशीर्वाद

बीएपीएसचे आध्यात्मिक प्रमुख महंत स्वामी महाराज यांनी पंतप्रधान लक्सन यांना पत्राद्वारे दिवाळी आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हटलं की, 'नवीन वर्ष न्यूझीलंडसाठी शांती, समृद्धी आणि एकतेचं प्रतीक ठरो.' महंत स्वामी महाराज हे भगवान स्वामीनारायणांचे सहावे आध्यात्मिक उत्तराधिकारी असून जगभरातील कोट्यवधी भक्तांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत.

हेही वाचा - JeM Online Course: महिलांच्या भरतीसाठी जैश-ए-मोहम्मदकडून ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू; मसूद अझहरच्या बहिणींच्या नेतृत्वाखाली देण्यात येतयं प्रशिक्षण

BAPS संस्थेची पार्श्वभूमी

बीएपीएस (Bochasanwasi Akshar Purushottam Swaminarayan Sanstha) ही एक जागतिक स्वयंसेवक-आधारित हिंदू संस्था आहे, जी वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती आणि समाजसेवेसाठी कार्य करते. न्यूझीलंडमध्ये बीएपीएसची स्थापना 1984 मध्ये झाली. आज या संस्थेची मंदिरे ऑकलंड, हॅमिल्टन, ख्राइस्टचर्च, रोटोरुआ आणि वेलिंग्टन येथे आहेत. संस्थेच्या BAPS Charities शाखेमार्फत आरोग्य, शिक्षण आणि अन्नदान क्षेत्रात अनेक उपक्रम राबवले जातात.


सम्बन्धित सामग्री