Pakistan Afghanistan War: पाकिस्तान-अफगाणिस्तान संघर्ष दिवसेंदिवस वाढत असून आता अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी पाकिस्तानला चेतावणी दिली आहे. 'जर पाकिस्तानला शांतता नको असेल, तर आमच्याकडे इतर पर्याय उपलब्ध आहेत,' असा इशारा मुत्ताकी यांनी दिला आहे. गुरुवारी पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांनंतर सीमापार तीव्र चकमकी सुरू झाल्या. अफगाण अधिकाऱ्यांनी सांगितले की रात्री झालेल्या कारवाईत त्यांच्या म्हणण्यानुसार 58 पाकिस्तानी सैनिक ठार झाले. त्याचबरोबर पाकिस्तानने काही अहवालांत 23 जवानांच्या मृत्यूचा दावा केल्याचीही नोंद आहे. पाकिस्तानने आपल्या बाजूनेही तक्रार नोंदवत, 19 अफगाण सीमा चौक्या ताब्यात घेतल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, मुत्ताकी यांनी सांगितले की अफगाण सैन्याने काल रात्री आमचे लष्करी उद्दिष्ट प्राप्त केले. कतार व सौदी अरेबियासारख्या मध्यस्थ देशांनी संघर्ष थांबवण्याचे आग्रह केल्यामुळे त्यांनी सध्या कारवाई थांबवली आहे. अफगाणिस्तानाला शांततेचेच हित आहे. आम्हाला फक्त चांगले संबंध आणि शांतता हवी आहे, असंही मुत्ताकी यांनी यावेळी नमूद केलं.
हेही वाचा - Israel-Hamas War: हमासने अचानक बदलली भूमिका; ट्रम्प यांचा 20 कलमी शांतता करार धोक्यात
तथापी, परराष्ट्रमंत्री मुत्ताकी यांनी टीटीपी (तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान) बद्दल बोलताना सांगितलं की, अफगाणिस्तानात सध्या टीटीपीचे अस्तित्व नाही. आम्ही काबूलला परतण्यापूर्वीही, पाकिस्तानी सैन्याने आदिवासी भागात कारवाया केल्या ज्यामुळे मोठ्या संख्येने लोक विस्थापित झाले. अमेरिकन सैन्य आणि अमेरिकेच्या पाठिंब्याने माजी सरकारने त्यांना अफगाणिस्तानच्या भूमीवर आश्रय दिला. ते विस्थापित भागातील पाकिस्तानी लोक आहेत आणि त्यांना देशात निर्वासित म्हणून राहण्याची परवानगी आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमा, डुरंड रेषा, 2400 किमी पेक्षा जास्त लांब आहे. ती 'चेंज' किंवा 'अंग्रेज' द्वारे नियंत्रित केली जाऊ शकत नाही, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
हेही वाचा -Pakistan Afghanistan War: अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर हल्ला; 58 पाकिस्तानी सैनिक ठार, 25 चौक्या ताब्यात
मुत्ताकी यांनी पुढे बोलसांना सांगितलं की, जर पाकिस्तानला शांतता हवी असेल तर त्याने त्या दिशेने काम केले पाहिजे. काहींना खूश करण्यासाठी त्याने अनेक लोकांचे जीव धोक्यात घालू नये. फक्त ताकदीने ते नियंत्रित करता येत नाही. जर पाकिस्तानला शांतता हवी असेल, तर त्यांच्याकडे मोठे सैन्य आणि चांगली गुप्तचर यंत्रणा आहे ते त्यावर नियंत्रण का ठेवत नाहीत? ही लढाई पाकिस्तानच्या आत आहे. आम्हाला दोष देण्याऐवजी त्यांनी त्यांच्या क्षेत्रातील समस्यांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. पाकिस्तान आपल्या लोकांना विश्वासात का घेत नाही? पाकिस्तानमधील अनेक लोकांना आणि निश्चितच आपल्यालाही ही लढाई सुरू राहावी असे वाटत नाही. पण पाकिस्तानने या गटांवर नियंत्रण ठेवावे. काहींना खूश करण्यासाठी स्वतःच्या लोकांना धोक्यात का घालायचे? असा सवालही मुत्ताकी यांनी उपस्थित केला.