इस्लामाबाद: भारताकडून पराभव स्विकारूनही पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताला पुन्हा एकदा युद्धाची धमकी दिली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे की, 'पंतप्रधान मोदी गोळ्या आणि पाणी थांबवण्याबद्दल बोलत आहेत. भारत आम्हाला सतत धमकावत आहे, पण जर पुन्हा युद्ध झाले तर आम्ही भारताला धडा शिकवू. कधी म्हणतात ते गोळ्यांनी उत्तर देतील, कधी ते म्हणतात की ते पाणी थांबवतील. माझा असा विश्वास आहे की सिंधू नदीच्या पाण्याचा प्रत्येक थेंब हा पाकिस्तानच्या लोकांचा हक्क आहे.'
सिंधू नदीच्या पाण्यावर पाकिस्तानचा हक्क आहे. आम्ही 1960 मध्ये सिंधू पाणी करारावर स्वाक्षरी केली होती. आता, भारत पाण्यासाठी आम्हाला दिवसरात्र धमकावतो. या युद्धापूर्वी ज्या पद्धतीने भारत धमक्या देत होता, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत. आता, जर त्यांनी आणखी काही केले तर, आम्ही त्यांना धडा शिकव, अशी धमकीही पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दिली आहे.
हेही वाचा - पाकिस्तानातील कराची तुरुंगातून 200 हून अधिक कैदी फरार; काय आहे नेमकं प्रकरण?
दरम्यान, युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला 'शांततेत भाकरी खा, नाहीतर आमची गोळी खा,' असं म्हटलं होतं. आता पंतप्रधान मोदींच्या विधानाची भीती स्पष्टपणे दिसून येत आहे. शाहबाज शरीफपासून ते बिलावल भुट्टोपर्यंत सर्वजण मोदींच्या या विधानावर भाष्य करत आहेत. शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानमधील भाषणादरम्यान मोदींच्या या विधानाचा उल्लेख केला, तर बिलावल भुट्टो यांनी अमेरिकेत मोदींच्या या विधानावर भाष्य केलं होतं.
हेही वाचा - भारताने 20 नव्हे तर 28 ठिकाणे उद्ध्वस्त केली होती! पाकिस्तानच्या कागदपत्रात मोठा खुलासा
बिलावल भुट्टोंची अमेरिकेत विनवणी -
तथापि, पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांमध्ये म्हटले की, पंतप्रधान मोदी सतत पाकिस्तानविरुद्ध भडकावणारी विधाने करत आहेत. बिलावल यांनी पंतप्रधान मोदींच्या 'भाकरी खा नाहीतर आमची गोळी खा' या विधानाचा उल्लेख केला. बिलावल पाकिस्तानच्या एका शिष्टमंडळासह अमेरिकेत पोहोचले असून त्यांनी भारताला चर्चेची विनंती केली.