Wednesday, June 18, 2025 03:31:09 PM

पाकिस्तानातील कराची तुरुंगातून 200 हून अधिक कैदी फरार; काय आहे नेमकं प्रकरण?

कराचीच्या मालीर तुरुंगात बंद असलेल्या 216 कैद्यांनी सोमवारी रात्री झालेल्या आपत्तीचा फायदा घेत तुरुंगातून पळ काढला. पाकिस्तानी पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 80 कैद्यांना पकडून तुरुंगात परत पाठवले आहे.

पाकिस्तानातील कराची तुरुंगातून 200 हून अधिक कैदी फरार काय आहे नेमकं प्रकरण
Prisoners escape from Karachi jail
Edited Image

इस्लामाबाद: पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तान आता तुरुंगातील कैद्यांना सांभाळण्यासही असमर्थ असल्याचं दिसून येत आहे. कारण, कराचीच्या मालीर तुरुंगात बंद असलेल्या 216 कैद्यांनी सोमवारी रात्री झालेल्या आपत्तीचा फायदा घेत तुरुंगातून पळ काढला. पाकिस्तानी पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 80 कैद्यांना पकडून तुरुंगात परत पाठवले आहे. यासंदर्भातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

भूकंपाच्या धक्क्यांमुळे उडाला तुरुंगात गोंधळ - 

दरम्यान, सोमवारी रात्री कराचीच्या मालीर जिल्हा तुरुंगात कैद्यांनी गोंधळ घातला. दोन दिवसांत सुमारे 11 भूकंप झाल्यामुळे तुरुंगाच्या भिंती कमकुवत झाल्या. या आपत्तीची संधी साधून कैद्यांनी फिल्मी शैलीत तुरुंगाचे कठडे तोडले. त्यानंतर अनेक कैद्यांनी तुरुंगातून पळ काढला. तथापि, कैद्यांच्या जमावाने तुरुंगातून बाहेर येऊन सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या दरम्यान तुरुंग परिसरात गोळीबार झाला, ज्यामुळे निवासी भागातील लोक घाबरले. 

हेही वाचा - पाकिस्तानातील 17 वर्षीय टिकटॉक स्टार सना युसूफची गोळ्या घालून हत्या

तथापि, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली आहे. तसेच मशिदींमधून लोकांनी कैद्यांना पकडण्यासाठी आवाहन करण्यात आहे. परिणामी नागरिकांच्या मदतीमुळे आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे 80 कैद्यांना ताबडतोब पकडण्यात आले. दरम्यान, कराचीच्या मालीर तुरुंगातून पळून गेलेल्या कैद्याने सांगितले की, 'भूकंपाच्या भीतीमुळे सर्वांनी 'पळा' असे म्हटले, म्हणून आम्हीही पळू लागलो. तुरुंगाचा मुख्य दरवाजा बंद होता, परंतु कैद्यांनी तो सर्व शक्तीनिशी तोडला.' 

हेही वाचा - भारताने 20 नव्हे तर 28 ठिकाणे उद्ध्वस्त केली होती! पाकिस्तानच्या कागदपत्रात मोठा खुलासा

रिपोर्टनुसार, मालीर तुरुंगात 700 ते 1 हजार कैदी आहेत. भूकंपामुळे त्यांना बॅरेकमधून बाहेर काढण्यात आले. या दरम्यान काही कैद्यांनी तुरुंग कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आणि त्यांची शस्त्रे हिसकावली. कैद्यांनी गोळीबार करताना तुरुंगाचे मुख्य गेट तोडले. भूकंपाच्या धक्क्याचा फायदा 200 हून अधिक कर्मचाऱ्यांनी तुरुंगातून पलायन केले. 


सम्बन्धित सामग्री