नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. भारताने पाकिस्तानातील 20 नव्हे तर 27 ठिकाणे उद्ध्वस्त केली. पाकिस्तानने स्वतः त्यांच्या कागदपत्रात यासंदर्भात खुलासा केला आहे. पाकिस्तानमधील एका अधिकृत कागदपत्रात असं म्हटलं आहे की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानच्या अनेक लक्ष्यांना लक्ष्य केले होते, ज्यांचा उल्लेख भारतीय हवाई दलाने किंवा लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (DGMO) गेल्या महिन्यात झालेल्या हवाई हल्ल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला नव्हता.
पाकिस्तानमधील कागदपत्रात मोठा खुलासा -
पाकिस्तानच्या ऑपरेशन 'बुनियां उन मरसूस' वर तयार केलेल्या कागदपत्रानुसार, भारताने किमान 8 अतिरिक्त ठिकाणांवर हल्ला केला, ज्यांचा भारताने अधिकृतपणे उल्लेख केलेला नाही. या कागदपत्रात दाखवलेल्या ठिकाणांमध्ये पेशावर, झांग, हैदराबाद (सिंध), गुजरात (पंजाब), गुजरांवाला, बहावलनगर, अटोक आणि चोर यांचा समावेश आहे.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान -
पाकिस्तानने कागदपत्रात ऑपरेशन सिंदूरमुळे झालेल्या नुकसानाबद्दल माहिती दिली आहे. यावरून हे स्पष्ट होते की ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानमध्ये खूप विनाश घडवून आणला होता. भारतीय सैन्याने ब्रीफिंगमध्ये सांगितलेल्या माहितीपेक्षा पाकिस्तानचे जास्त नुकसान झाले आहे. यावरून पाकिस्तानने युद्धबंदीची विनंती का केली? याचे कारण समोर आलं आहे.
हेही वाचा - पाकिस्तानातील 17 वर्षीय टिकटॉक स्टार सना युसूफची गोळ्या घालून हत्या
पाकिस्तानला प्रतिउत्तर देण्यासाठी भारताने सुरू केले ऑपरेशन सिंदूर
दरम्यान, 22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांना लक्ष्य करून ही प्रत्युत्तरात्मक कारवाई केली होती. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पहलगाममध्ये 26 निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला. भारताच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईत, पीओके आणि पाकिस्तानमध्ये एकूण 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले.
हेही वाचा - 'पाकिस्तान मूलभूत हक्कांशी तडजोड करणार नाही...'; असीम मुनीर यांचा सिंधू करारावरून भारताला इशारा
तत्पूर्वी मक्सर टेक्नॉलॉजीजने जारी केलेल्या उपग्रह प्रतिमांमध्ये ऑपरेशन सिंदूर दरम्यान अचूक हल्ल्यांमुळे पाकिस्तानला झालेले मोठे नुकसान उघड झाले होते. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांवर नऊ हल्ले केले होते, ज्यात बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय आणि मुरीदके येथील लष्कर-ए-तैयबा प्रशिक्षण केंद्र यांचा समावेश होता.