Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी मंगळवारी रात्री फोनवर संपर्क साधून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या संभाषणानंतर ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताच्या रशियाकडून तेल खरेदीबाबत मोठा दावा केला आहे. ट्रम्पच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान मोदींनी त्यांना सांगितले की भारत आता रशियाकडून जास्त प्रमाणात तेल खरेदी करणार नाही.
हेही वाचा - Diwali 2025: न्यूझीलंडमध्ये दिवाळीचा जल्लोष! पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी वेलिंग्टनच्या स्वामीनारायण मंदिरात साजरी केली दिवाळी
ट्रम्प यांनी म्हटलं आहेक की, 'मी भारताच्या लोकांवर प्रेम करतो. भारत आणि अमेरिका यांच्यातील महत्त्वाच्या व्यापारी करारावर आमची चर्चा सुरू आहे. पंतप्रधान मोदींशी बोलताना त्यांनी मला सांगितले की ते रशियाकडून तेल खरेदी कमी करणार आहेत. यामुळे युक्रेन आणि रशियामधील संघर्षावर सकारात्मक परिणाम होईल.' त्यांनी पुढे स्पष्ट केले की, 'भारताने रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीत मोठी कपात केली आहे आणि ही कपात वाढत राहील. आम्ही व्यापाराबाबतही चर्चा केली. भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणताही संघर्ष होऊ नये. तसेच अमेरिकेसोबत व्यापार सुरू राहील याची काळजी घेतली जाईल.'
हेही वाचा - JeM Online Course: महिलांच्या भरतीसाठी जैश-ए-मोहम्मदकडून ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू; मसूद अझहरच्या बहिणींच्या नेतृत्वाखाली देण्यात येतयं प्रशिक्षण
दरम्यान, ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक करत सांगितले की ते एक महान व्यक्तिमत्त्व आहेत आणि गेल्या काही वर्षांपासून ते त्यांचे चांगले मित्र देखील आहेत. ट्रम्प यांच्या या दाव्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.