Tuesday, November 18, 2025 10:07:35 PM

US Truck Crash: अमेरिकेत भारतीय ट्रक चालकाने अनेक गाड्यांना उडवलं; 3 जणांचा मृत्यू; पहा थरकाप उडवणारे दृश्य

या प्रकरणी 21 वर्षीय भारतीय ट्रक चालक जशनप्रीत सिंग याला पोलिसांनी अटक केली आहे. अपघाताचा भयानक व्हिडिओ ट्रकच्या डॅशकॅमवर कैद झाला असून, तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

us truck crash अमेरिकेत भारतीय ट्रक चालकाने अनेक गाड्यांना उडवलं 3 जणांचा मृत्यू पहा थरकाप उडवणारे दृश्य

US Truck Crash: दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या एका भीषण ट्रक अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी 21 वर्षीय भारतीय ट्रक चालक जशनप्रीत सिंग याला पोलिसांनी अटक केली आहे. अपघाताचा भयानक व्हिडिओ ट्रकच्या डॅशकॅमवर कैद झाला असून, तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

कसा झाला अपघात?

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जशनप्रीत सिंगचा ट्रक एका कारला मागून जबर धडक देतो, आणि ती कार पुढील वाहनावर जाऊन आपटते. धडकेनंतर काही क्षणांतच रस्त्यावर गोंधळ उडतो. गाड्या एकमेकांवर आपटतात आणि घटनास्थळी आरडाओरड ऐकू येते. 

हेही वाचा - Countries Where Poverty Is Illegal: या देशांमध्ये गरीब असणं म्हणजे गुन्हा! शोधूनही सापडत नाहीत भिकारी

तीन जणांचा जागीच मृत्यू 

या दुर्घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जशनप्रीत सिंग स्वतःही या अपघातात गंभीर जखमी झाला असून, सध्या रुग्णालयात उपचाराधीन आहे. कॅलिफोर्निया हायवे पेट्रोल (CHP) च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जशनप्रीत दारूच्या नशेत वाहन चालवत होता.

हेही वाचा - Meta Layoffs: मेटाने AI युनिटमधून 600 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले; FAIR, TDB लॅब आणि इन्फ्रास्ट्रक्चर युनिट प्रभावित

CHP अधिकारी रॉड्रिगो जिमेनेझ यांनी म्हटले की, रुग्णालयात चाचणी घेतल्यानंतर स्पष्ट झाले की तो ड्रग्जच्या प्रभावाखाली ट्रक चालवत होता. या कारणामुळेच तो ब्रेक लावण्यात अपयशी ठरला आणि अपघात झाला. तथापी, तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे की, जशनप्रीत सिंगने 2022 मध्ये अमेरिकेत बेकायदेशीररित्या प्रवेश केला होता. त्यावेळी कॅलिफोर्नियाच्या एल सेंट्रो सेक्टरमध्ये बॉर्डर पेट्रोल एजंटांनी त्याला अटक केली होती. परंतु बायडेन प्रशासनाच्या धोरणांनुसार, त्याला सुनावणीपर्यंत सोडण्यात आले.

अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने पुष्टी केली की, त्याच्याकडे देशात राहण्यासाठी कोणतेही वैध कागदपत्र नव्हते. दरम्यान, सोशल मीडियावर लाखो लोकांनी या अपघाताचा व्हिडिओ पाहिला असून, अनेकांनी भारतीय चालकाच्या निष्काळजीपणावर टीका केली आहे.  


सम्बन्धित सामग्री