तेहरान: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इराणने इस्रायलविरुद्ध युद्धाची घोषणा केली आहे. खामेनी यांनी आज राष्ट्राला संबोधित केले. खामेनी यांच्या भाषणानंतर लगेचच इस्रायलने इराणवर हवाई हल्ला केला. इस्रायलने तेहरानच्या लाविझान भागात हा हवाई हल्ला केला. लाविझान हा खामेनींचा गुप्त अड्डा मानला जातो. अशा परिस्थितीत, इस्रायलने खामेनींना लक्ष्य करून हा हल्ला केला आहे की, इस्रायल या हल्ल्याद्वारे खामेनींना संदेश देऊ इच्छित आहे असे प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शरणागती पत्करण्यास इराणचा नकार -
इराणने इस्रायलसमोर शरणागती पत्करण्यास नकार दिला आहे. सहा दिवसांपूर्वी इस्रायली हल्ले सुरू झाल्यानंतर अयातुल्ला अली खामेनी यांनी आज पुन्हा देशाला संबोधित केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये बिनशर्त शरणागती पत्करण्याची मागणी केल्यानंतर एका दिवसात खामेनी यांनी युद्धाची घोषणा केली आहे.
हेही वाचा - इराणने अधिकृतपणे इस्रायलविरोधात युद्ध केले जाहीर; खामेनी यांनी दिली एक्स पोस्टवर माहिती
दरम्यान, ट्रम्प यांनी शुक्रवारी इस्रायलच्या अचानक झालेल्या हल्ल्यापासून स्वतःला दूर ठेवले. तथापी, अलिकडच्या काळात त्यांनी अमेरिकेच्या मोठ्या सहभागाचे संकेत दिले आहेत. ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, त्यांना युद्धबंदीपेक्षा काहीतरी मोठे हवे आहे. अमेरिकेने या प्रदेशात अधिक लष्करी विमाने आणि युद्धनौका देखील पाठवल्या आहेत.
हेही वाचा - 'आम्ही मध्यस्थी स्वीकारणारी नाही आणि स्वीकारणारही नाहीत...', पंतप्रधान मोदींचे ट्रम्प यांना सडेतोड उत्तर
तथापी, खामेनी यांनी इराणी शरणागती पत्करणार नाही, असं स्पष्ट करत इस्त्रायलविरोधात युद्धाची घोषणा केली आहे. इराण, त्याचे लोक आणि त्याचा इतिहास जाणणारे शहाणे लोक कधीही या राष्ट्राशी धमकीच्या भाषेत बोलत नाहीत, कारण इराणी राष्ट्र शरणागती पत्करणार नाही, असे त्यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे.