देशाच्या नैऋत्येकडील ओंडो राज्यात मोठी विमान अपघाताची घटना घडली आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबत संपर्क तुटल्याने लष्काराच्या विमानाचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या विमानात 25 प्रवासी तर 7 क्रू मेंबर्स असा एकून 32 जणांचा समावेश होता. दरम्यान या भीषण दुर्घटनेत 32 जणांचा मृत्यू झाला आहे.
या अपघातात काही स्थानिक नागरिकही गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला अहमद टिनुबू यांनी खुलासा केला आहे की, नायजेरियन हवाई दलाचे विमान कोसळल्याने 32 जणांचा मृत्यू झाला आहे. यावेळी 25 प्रवासी आणि 7 विमान कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त करणाऱ्या राष्ट्रपती कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनातून ही माहिती समोर आली आहे.
हेही वाचा- हिंगोलीत फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; 2 जणांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जण जखमी
नायजेरियाचे हवाई वाहतूक मंत्री, फेस्टस केयामो यांनी यापूर्वी सांगितले होते की, सोमवारी बेनिन सिटीहून लागोसकडे जात असताना हवाई दलाच्या एटीआर 42 या विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रण टॉवरशी संपर्क तुटला आणि ते देशाच्या नैऋत्य भागात कोसळले. केयामो यांनी स्पष्ट केले की, ओंडो राज्यातील इग्बुकोडा जिल्ह्यातील नौदल तळाजवळ विमान कोसळले.
विमानाचा मलबा सापडला असून, शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. अपघातानंतर इग्बोकोडा या किनारी शहरालगत विमानाचा ढिगारा आढळून आला. तिथे शोध आणि बचाव पथके तैनात करण्यात आली होती. मात्र, या घटनेने मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे. हा एक मोठा विमान अपघात आहे. विमानातील एकही व्यक्ती जिंवंत राहू शकला नाही. हळहळ व्यक्त केली जाते आहे.