Iran Israel War: इराण आणि इस्रायलमध्ये गेल्या आठवडाभरापासून युद्ध सुरू आहे. इराणने इस्रायलच्या सोरोका रुग्णालयावर हवाई हल्ला केला. या हल्ल्याचे सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने रुग्णालयावर हल्ला केल्यानंतरची परिस्थिती दाखवली आहे. रुग्णालयाने म्हटले आहे की, इमारतीचे आणि आजूबाजूच्या परिसराचे खूप नुकसान झाले आहे. दरम्यान, सोरोका रुग्णालयावर इराणने केलेल्या हल्ल्याबद्दल बोलताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटलं की, 'हा फरक आहे. आम्ही अणु लक्ष्ये आणि क्षेपणास्त्र तळांना लक्ष्य करत आहोत आणि ते रुग्णालयाला लक्ष्य करत आहेत, जिथून लोक उठून पळूनही जाऊ शकत नाहीत. ते मुलांच्या वॉर्डला लक्ष्य करत आहेत. हा त्यांच्यातील आणि आमच्यातील फरक आहे.'
हेही वाचा - इराणने अधिकृतपणे इस्रायलविरोधात युद्ध केले जाहीर; खामेनी यांनी दिली एक्स पोस्टवर माहिती
दरम्यान, अली खामेनी यांच्यावरील हल्ल्याशी संबंधित प्रश्नावर बेंजामिन नेतान्याहू म्हणाले, 'इस्रायल लवकरच कारवाई करेल. मी आत्ता बोलणार नाही पण काय कारवाई होते ते जग पाहिल.' तथापी, एका इराणी अधिकाऱ्यांनी सांगितले की हा हल्ला जाणूनबुजून करण्यात आला नव्हता, तर आमचे लक्ष्य जवळील लष्करी गुप्तचर स्थळ होते.
हेही वाचा - खामेनी यांनी युद्धाची घोषणा केल्यानंतर लगेचचं इस्रायलचे तेहरानवर हवाई हल्ले
तथापि, याला उत्तर देताना, इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितले की हे विधान केवळ दिशाभूल करणारे आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट म्हणाले, 'हा जाणूनबुजून केलेला आणि क्रूर हल्ला होता.' इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ला करत आहेत. या युद्धात इराणचे मोठे नुकसान झाले आहे. अमेरिका इराणला इशारा देत असून इराणच्या सर्वोच्च नेत्याला शरण येण्यास सांगत आहे. परंतु, इराणने अमेरिकेला हस्तक्षेप करू नये, असा सल्ला दिला आहे.