Russian drone strike on the northern Ukrainian प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image
Ukraine Russia War: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. रशियाने युक्रेनमध्ये भयंकर हल्ला केला आहे. गुरुवारी रात्री उत्तर युक्रेनमधील प्रिलुकी शहरावर रशियन ड्रोन हल्ल्यात एका वर्षाच्या मुलासह किमान पाच जणांचा मृत्यू झाला आहे. प्रादेशिक राज्यपाल व्याचेस्लाव चाउस यांनी गुरुवारी याबद्दल माहिती दिली. हल्ल्यात आणखी सहा जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चाउस यांनी यांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी सहा शाहेद वर्गाच्या ड्रोनने प्रिलुकीच्या निवासी भागात हल्ला केला, ज्यामुळे निवासी इमारतींचे मोठे नुकसान झाले. काही तासांनंतर प्रादेशिक प्रमुख ओलेह सिन्युबोव्ह यांनी 'टेलिग्राम' वर सांगितेल की, गुरुवारी पूर्व युक्रेनमधील खार्किव शहरात रशियन ड्रोन हल्ल्यात 17 लोक जखमी झाले आहेत, ज्यात मुले, एक गर्भवती महिला आणि एक 93 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
हेही वाचा - अमेरिकेत 12 देशांच्या नागरिकांना प्रवेश बंदी; राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
दरम्यान, पहाटे 1:05 वाजता रशियन ड्रोनने स्लोबिडस्की जिल्ह्यातील दोन अपार्टमेंटवर हल्ला केला, ज्यामुळे आग लागली. या हल्ल्यामुळे अनेक खाजगी वाहने नष्ट झाली. या हल्ल्यांपूर्वी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवर संभाषण झाले होते. ट्रम्प यांनी म्हटलं की, पुतिन यांनी बुधवारी फोनवर त्यांना खूप ठामपणे सांगितले की ते आठवड्याच्या शेवटी रशियन विमानतळांवर युक्रेनच्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर देतील. ही चांगली चर्चा होती, परंतु त्या संभाषणामुळे तात्काळ शांतता प्रस्थापित होणे शक्य नव्हते. तथापी, रशियामध्ये युक्रेन हल्ल्यावर ट्रम्प यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे.
हेही वाचा - ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील 21 सदस्यांचा मृत्यू; जैश-ए-मोहम्मदकडून मोठा खुलासा
युक्रेनबाबत पुतिन यांनी दिला होता इशारा -
अलिकडेच युक्रेनने रशियामधील त्यांच्या अनेक हवाई तळांवर प्राणघातक ड्रोन हल्ला केला. युक्रेनने केलेल्या या हल्ल्यात अनेक रशियन बॉम्बर आणि इतर विमाने नष्ट झाली होती. त्यानंतर बुधवारी रशियानेही युक्रेनच्या या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भात मोठा खुलासा केला होता. सीएनएनच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी म्हटले होते की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांना फोनवरून ते युक्रेनच्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर देतील असं सांगितलं होतं.