Monday, June 23, 2025 12:52:42 PM

ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील 21 सदस्यांचा मृत्यू; जैश-ए-मोहम्मदकडून मोठा खुलासा

पाकिस्तानच्या बहावलपूर भागातील मरकझ सुभानल्लाहजवळील कब्रस्तानचे अनेक फोटो समोर आले आहेत. हे फोटो जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनेच सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. या फोटोंमध्ये 21 कबरी दिसत आहेत.

ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील 21 सदस्यांचा मृत्यू जैश-ए-मोहम्मदकडून मोठा खुलासा
Terrorist Masood Azhar
Edited Image

इस्लामाबाद: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत मोठा खुलासा झाला आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान दहशतवादी मौलाना मसूद अझहरच्या कुटुंबातील सुमारे 21 सदस्य मारले गेले. यामध्ये दहशतवाद्याचा भाऊ, मेहुणा आणि इतर कुटुंबातील सदस्यांचा समावेश होता. आता पाकिस्तानच्या बहावलपूर भागातील मरकझ सुभानल्लाहजवळील कब्रस्तानचे अनेक फोटो समोर आले आहेत. हे फोटो जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनेच सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. या फोटोंमध्ये 21 कबरी दिसत आहेत.

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हे फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत. या सर्व कबरी दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील सदस्यांच्या असल्याचे सांगितले जात आहे. शेअर केलेल्या व्हिडिओ आणि फोटोंच्या पार्श्वभूमीवर मसूद अझहरचा आवाजही येत आहे. ज्यामध्ये मसूद जिहादवर भाषण देत आहे. भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरने दहशतवादी मसूद अझहरचे सुमारे 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. 

हेही वाचा - 'पुन्हा युद्ध झाले तर आम्ही भारताला धडा शिकवू...'; पाकिस्तान पंतप्रधान शाहबाज यांची भारताला धमकी

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरच हल्ला - 

दरम्यान, पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरच हल्ला केला होता. या हल्ल्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील सदस्यांचाही मृत्यू झाला. आता मसूद अझरच्या कुटुंबातील व्यक्तींच्या कबरींचे फोटो समोर आल्यानंतर लोकांना ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे पुरावे मिळाले आहेत. या कारवाईअंतर्गत मोदी सरकारने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर थेट हल्ला केला होता.

हेही वाचा - भारताने 20 नव्हे तर 28 ठिकाणे उद्ध्वस्त केली होती! पाकिस्तानच्या कागदपत्रात मोठा खुलासा

ऑपरेशन सिंदूरमुळे जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटनाही बरीच कमकुवत झाली आहे. बहावलपूरमधील दहशतवाद्यांच्या कबरींचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण जगाला या कारवाईचे पुरावे मिळाले आहेत. यापूर्वी पाकिस्तानने भारताने नागरी वस्त्यांना लक्ष्य केल्याचा आरोप केला होता. मात्र, आता या कबरींच्या फोटोंमुळे जगासमोर वास्तव आलं असून पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आला आहे. 
 


सम्बन्धित सामग्री