US China Relations: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग लवकरच आशियाई दौऱ्यात भेटणार आहेत. या भेटीकडे केवळ अमेरिका आणि चीनच नव्हे, तर जगभरातील अनेक देशांचे लक्ष लागले आहे. दोघांमध्ये 30 ऑक्टोबर रोजी दक्षिण कोरियाची राजधानी सोल येथे बैठक होणार आहे. ट्रम्प 25 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत आशियाई दौऱ्यावर असतील. या दौऱ्यात ते मलेशियातील 47 व्या आसियान शिखर परिषदेत सहभागी होतील आणि जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान साने ताकाची, तसेच दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग यांचीही भेट घेतील.
हेही वाचा - Afghanistan Stop Pakistan Water Supply: भारतानंतर आता अफगाणिस्तान देखील अडवणार पाकिस्तानेच पाणी; कुनार नदीवर बांधण्यात येणार धरण
बैठकीतील मुख्य मुद्दे
या उच्चस्तरीय भेटीत अनेक महत्त्वाच्या जागतिक विषयांवर चर्चा अपेक्षित आहे
टॅरिफ युद्ध: ट्रम्प यांनी चीनवर लादलेल्या 55-58 टक्के टॅरिफला 1 नोव्हेंबरपासून 100 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ही चर्चा तणावपूर्ण होण्याची शक्यता.
व्यापार करार: अमेरिका-चीन व्यापार करार पुन्हा सुरू करण्यावर भर.
हेही वाचा - Putin Warning To America: अमेरिकेच्या टॉमहॉक मिसाइल निर्णयावर पुतिन संतापले; अमेरिकाला दिला थेट हा इशारा...
दुर्मिळ पृथ्वी खनिजे (Rare Earth Minerals): चीनच्या निर्यातीवरील निर्बंध सैल करण्याबाबत अमेरिकेची मागणी.
रशिया-युक्रेन युद्ध: ट्रम्प या युद्धात चीनची मध्यस्थी मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात.
रशियाकडून तेल खरेदी: ट्रम्प चीनला रशियाकडून तेल खरेदी कमी करण्याचे आवाहन करू शकतात. या भेटीद्वारे जागतिक अर्थव्यवस्था, व्यापार धोरणे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठे बदल घडू शकतात.