Ukraine drone attacks On Russian air bases
Edited Image
मॉस्को: युक्रेनने रशियाच्या 2 एअरबेसवर मोठा ड्रोन हल्ला केला. एका रशियन अधिकाऱ्यानेही युक्रेनने केलेल्या या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. या हल्ल्यात किमान 3 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. हल्ल्याच्या ठिकाणी धुराचे लोट उठताना दिसत आहेत. युक्रेनियन माध्यमांचा दावा आहे की, यावेळी 40 हून अधिक रशियन विमाने नष्ट झाली आहेत. रशियाच्या इर्कुत्स्क प्रदेशाच्या गव्हर्नरने सायबेरियात झालेल्या पहिल्या ड्रोन हल्ल्याची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, लष्करी युनिटला लक्ष्य करण्यात आले आहे. या धोक्याचा सामना करण्यासाठी लष्कर आणि नागरी कृती दल आधीच कार्यरत आहेत.
रशियाचे 40 हून अधिक विमाने नष्ट -
द सनच्या वृत्तानुसार, युक्रेनने रशियाच्या दोन प्रमुख एअरबेसवर मोठा ड्रोन हल्ला केल्याचा दावा केला आहे, ज्यामध्ये 40 हून अधिक रशियन लष्करी विमाने नष्ट झाल्याचा आरोप आहे. युक्रेनियन सुरक्षा सेवेच्या (SBU) अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला रशियाच्या ओलेन्या एअरबेस आणि बेलाया एअरबेसवर करण्यात आला. या हल्ल्यात नष्ट झालेल्या लढाऊ विमानांमध्ये A-50 AWACS विमानांचाही समावेश आहे.
हेही वाचा - Nigeria Flood: नायजेरियात पुरामुळे मोठा विध्वंस! 117 जणांचा मृत्यू, पहा व्हिडिओ
इराण ऑब्झर्व्हरने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एअरबेसवर पार्क केलेली रशियन विमाने नष्ट होताना दिसत आहेत. युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आणि प्राणघातक ड्रोन हल्ला मानला जात आहे. युक्रेनने हा हल्ला अशा वेळी केला आहे जेव्हा फक्त एक दिवसापूर्वी रशियाने सीमेपलीकडे 50 हजार सैनिक तैनात करून कीवमध्ये जमिनीवर हल्ला करण्याची योजना आखली होती.
हेही वाचा - एलोन मस्क यांनी आठवड्यातून किमान 40 तास काम करावे; टेस्ला गुंतवणूकदारांचे कंपनीच्या मंडळाला पत्र
ऑपरेशन वेब -
युक्रेनियन मीडियाने या ऑपरेशनला ऑपरेशन वेब असे नाव दिले आहे, ज्याचा उद्देश रशियन सैन्याला नि:शस्त्र करणे आहे. रशियाने या हल्ल्याची अधिकृतपणे पुष्टी केलेली नसली तरी, हा हल्ला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.