Monday, March 09, 2026 02:57:08 AM

Unique Railway Station : ना एन्ट्री गेट, ना तिकीट खिडकी, ना बाहेर जाण्याचा रस्ता! इथं जाण्या-येण्यासाठी वाहनही रेल्वेच! पण माणसं नेमकी जातात तरी कुठं?

या स्टेशनवर केवळ एक प्लॅटफॉर्म असून तिथे कोणतीही इमारत किंवा तिकीट खिडकी नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, स्टेशनवर पोहोचण्यासाठी किंवा तिथून बाहेर जाण्यासाठी रेल्वे हा एकमेव पर्याय आहे.

unique railway station  ना एन्ट्री गेट ना तिकीट खिडकी ना बाहेर जाण्याचा रस्ता इथं जाण्या-येण्यासाठी वाहनही रेल्वेच पण माणसं नेमकी जातात तरी कुठं

Interesting Facts about Weird Railway Station : रेल्वे प्रवासादरम्यान आपण अनेक स्थानके पाहतो, जिथे प्रवाशांची प्रचंड गर्दी, लिफ्ट, तिकीट काउंटर आणि सुरक्षिततेसाठी एन्ट्री-एक्झिट गेट्स असतात. मात्र, जगात एक असे अनोखे रेल्वे स्टेशन आहे, जिथे एन्ट्री किंवा एक्झिट गेटच नाही. या स्टेशनवर रेल्वे थांबते, प्रवासी प्लॅटफॉर्मवर उतरतात, पण त्यांना स्टेशनबाहेर जाण्यासाठी कोणताही रस्ता उपलब्ध नाही. हे आश्चर्यकारक स्टेशन सध्या जगभरात पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.

कुठे आहे हे अनोखे स्टेशन?
या स्टेशनवर केवळ एक प्लॅटफॉर्म असून तिथे कोणतीही इमारत किंवा तिकीट खिडकी नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, स्टेशनवर पोहोचण्यासाठी किंवा तिथून बाहेर जाण्यासाठी रेल्वे हा एकमेव पर्याय आहे; कारण तिथे पायी येण्या-जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही. हे रेल्वे स्टेशन भारतात नसून जपानमध्ये आहे. दक्षिण जपानमधील 'निशिकिगावा शिरयू लाइन'वर हे स्टेशन वसलेले असून त्याचे नाव 'शिरयू-मिहार्शी' (Seiryu Miharashi Station) असे आहे. या स्टेशनचा उद्देश प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे हा नसून, त्यांना निसर्गाचा आनंद देऊ करणे हा आहे.

हेही वाचा - भारतातील असे एकमेव राज्य जिथे जात नाही रेल्वे; निसर्गाचं नंदनवन असलेलं हे कोणतं राज्य आहे, ठाऊक आहे का?

केवळ 10 मिनिटांचा थांबा अन् पर्यटकांसाठी एक वेगळा अनुभव
शिरयू-मिहार्शी या स्टेशनला भेट देणे हा रेल्वेप्रेमी आणि निसर्ग प्रेमींसाठी एक खास अनुभव ठरतो. ही रेल्वे निशिकी नदीच्या काठावर एका निसर्गरम्य ठिकाणी थांबते. रेल्वे इथे केवळ 10 मिनिटांसाठी थांबवली जाते. या वेळेत प्रवासी प्लॅटफॉर्मवर उतरून समोर वाहणारी नदी, घनदाट जंगल आणि पर्वतांचे विलोभनीय सौंदर्य अनुभवतात. फोटो काढल्यानंतर प्रवासी पुन्हा त्याच रेल्वेने पुढच्या प्रवासाला निघतात. जपानमधील रेल्वे प्रशासन आपल्या प्रवाशांना केवळ प्रवासच नाही, तर आयुष्यभर लक्षात राहील अशा आठवणी सोबत देते.

निसर्गाच्या सानिध्यात जाण्यासाठी विशेष निर्मिती
जपानने आपल्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेने हे स्टेशन केवळ निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी विकसित केले आहे. हे स्टेशन अशा ठिकाणी बांधले आहे जिथे आजूबाजूला कोणतीही मानवी वस्ती नाही. प्रवाशांना काही काळ शहराच्या गडबडीतून दूर नेऊन निसर्गाच्या जवळ शांतता मिळावी, हाच यामागील मुख्य हेतू आहे. म्हणूनच, बाहेर जाण्यासाठी गेट नसल्यामुळे तिथे कुणीही चुकून उतरून हरवण्याची शक्यता उरत नाही. शिरयू-मिहार्शी स्टेशन हे त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल, तर या 'गेटलेस' स्टेशनचा प्रवास तुमच्यासाठी पर्वणीच ठरेल.

हेही वाचा - Indian Railway : ना न्यूयॉर्क, ना टोकियो; ''या'' भारतीय रेल्वे जंक्शनची कनेक्टिव्हिटी जगात भारी! 7 दिशांना धावतात ट्रेन


सम्बन्धित सामग्री