Friday, April 25, 2025 10:02:45 PM

कोणत्या अंतराळविराने अंतराळात आतापर्यंत सर्वाधिक दिवस घालवले? सुनीता विल्यम्स कितव्या स्थानावर आहेत? जाणून घ्या

कोणत्या अंतराळवीराने अंतराळात सर्वाधिक दिवस घालवले आहेत? बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स या क्रमवारीत कितव्या स्थानावर आहेत? यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

कोणत्या अंतराळविराने अंतराळात आतापर्यंत सर्वाधिक दिवस घालवले सुनीता विल्यम्स कितव्या स्थानावर आहेत जाणून घ्या
Which Astronauts spent most days in space
Edited Image

Which Astronauts Spent Most Days in Space: बुच विल्मोर आणि भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स 19 मार्च रोजी 9 महिन्यांच्या अंतराळ प्रवासातून पृथ्वीवर परतले आहेत. आता अनेकांना असा प्रश्न पडला आहे की, कोणत्या अंतराळवीराने अंतराळात सर्वाधिक दिवस घालवले आहेत? बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स या क्रमवारीत कितव्या स्थानावर आहेत? यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

नासाच्या आकडेवारीनुसार, व्हॅलेरी पॉलीकोव्ह यांच्याकडे अंतराळात सर्वाधिक 437 दिवस घालवण्याचा विक्रम आहे. त्यांनी हा प्रवास 1994-1995 दरम्यान पूर्ण केला. याशिवाय, पृथ्वीभोवती 7000 पेक्षा जास्त वेळा प्रदक्षिणा घालण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. तथापि, या यादीत सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा समावेश पहिल्या दहामध्ये आहे. ज्यांनी अलीकडेच अंतराळात 286 दिवस घालवले आहेत.  

हेही वाचा- 2031 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची 'व्हॅलिडिटी' संपणार; तुम्हाला माहीत आहे का, नासा ISSला कसं निवृत्त करेल?

कोणत्या अंतराळवीराने अंतराळात किती दिवस घालवले?

व्हॅलेरी पॉलीकोव्ह - 437 दिवस
सर्गेई अव्देयेव - 379 दिवस
फ्रँक रुबियो - 371 दिवस
व्लादिमीर टिटोव्ह आणि मुसा मानारोव्ह - 365 दिवस 
मार्क वंदे हेई - 355 दिवस
स्कॉट केली आणि मिखाईल कॉर्नियेन्को - 340 दिवस
क्रिस्टीना कोच - 328 दिवस
पेगी व्हिटसन - 289 दिवस
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर - 286 दिवस
अँड्र्यू मॉर्गन - 272 दिवस

हेही वाचा - Sunita Williams Love Story : सुनीता विल्यम्स यांचे पती कोण? जाणून घ्या त्यांची लव स्टोरी

पूर्व नियोजनाशिवाय 9 महिन्यांहून अधिक काळ अंतराळात घालवला - 

दरम्यान, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना 8 दिवसांच्या मोहिमेवर पाठवण्यात आले. परंतु तांत्रिक त्रुटींमुळे त्यांना 286 दिवस अंतराळात घालवावे लागले. या काळात सुनीता विल्यम्सने 62 तास अंतराळात फिरण्याचा विक्रमही केला. महिला अंतराळवीर म्हणून, सुनीता विल्यम्स यांनी सर्वात जास्त काळ अंतराळात फिरण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी एकूण 62 तास 6 मिनिटे अंतराळात वॉक केला. अशा प्रकारे सुनीता विल्यम्सने पेगी व्हिटसनचा 60 तास 21 मिनिटांचा विक्रम मागे टाकला.
 


सम्बन्धित सामग्री