Friday, April 25, 2025 08:50:01 PM

Sunita Williams Love Story : सुनीता विल्यम्स यांचे पती कोण? जाणून घ्या त्यांची लव स्टोरी

Sunita Williams Love Story : सुनिता विल्यम्सचे पती कोण आहेत. त्यांची लव स्टोरी काय आहे. हे पाहुयात...

sunita williams love story  सुनीता विल्यम्स यांचे पती कोण जाणून घ्या त्यांची लव स्टोरी
Sunita Williams Love Story : सुनीता विल्यम्स यांचे पती कोण? जाणून घ्या त्यांची लव स्टोरी

Sunita Williams Love Story : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम्स अखेर 286 दिवसांच्या प्रदीर्घ मिशननंतर पृथ्वीवर सुखरूप परतल्या आहेत. नासाच्या बुच विलमोर, निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव यांच्यासह त्या पृथ्वीवर परत आल्या. या मिशनदरम्यान त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) अनेक महत्त्वाचे प्रयोग आणि संशोधन केलं आहे.

स्पेस एक्सच्या ड्रॅगन स्पेस क्राफ्टद्वारे ही टीम फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ समुद्रात यशस्वीरीत्या उतरली. भारतीय वेळेनुसार 19 मार्चच्या पहाटे 3:27 वाजता ही लँडिंग पार पडली. हा अंतराळ प्रवास अनेक कारणांसाठी विशेष ठरला असून सुनिता विल्यम्स यांच्या योगदानामुळे भारतीय वंशाच्या लोकांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट ठरली आहे.

हेही वाचा -  सुनिता विल्यम्सने गणपती बाप्पाची मूर्ती सोबत नेली होती! चुलत बहिणीने सांगितलं, सुनिता आहे भारतीय खाद्यपदार्थांचीही चाहती

आता अनेक जण सुनिता विल्यम्स यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत. यात खासकरून त्यांचे पती कोण आहेत? याची माहिती घेण्यासाठी नागरिक गुगलवर सर्च करत आहेत. या लेखात सुनिता विल्यम्सचे पती कोण आहेत. त्यांची लव स्टोरी काय आहे. याचा आढावा घेऊयात.

हेही वाचा - Sunita Williams : नऊ महिने अंतराळात राहिल्यानंतर कशी आहे सुनिता विल्यम्सची तब्येत? जाणून घेऊ सर्व माहिती..

कोण आहेत सुनिता विल्यम्सचे पती

मायकल जे. विल्यम्स हे सुनिता विल्यम्स यांचे पती आहेत. ते फेडरल मार्शल (Federal Marshal) आहेत. अमेरिकेतील न्यायपालिका आणि कायद्याची अंमलबजावणी करण्याची फेडरल मार्शल यांच्यावर असते. मायकेल हे अतिशय व्यस्त असले तरी त्यांनी नेहमीच सुनिता यांना त्यांच्या अंतराळ मोहिमांसाठी समर्थन आणि प्रेरणा दिली आहे. मागील 20 वर्षांपासून ते दोघे एकत्र आहेत.  

 

सुनिता-मायकल यांची लव्ह स्टोरी अशी बहरली

1987 साली मेरीलँडमधील अॅनापोलिस नेव्हल अकादमी येथे सुनिता आणि मायकल यांची पहिली भेट झाली. त्या वेळी सुनिता या एक हेलिकॉप्टर पायलट म्हणून प्रशिक्षण घेत होत्या  आणि मायकल देखील एक अनुभवी हेलिकॉप्टर पायलट होते. दोघांच्या आवडीनिवडी एकच होत्या. त्यामुळं दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. पुढं मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि पुढं दोघांनी लग्न केलं. 


सम्बन्धित सामग्री