Countries vith Nuclear Weapons : जगभरात सध्या वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अण्वस्त्रे (Nuclear Weapons) बाळगणाऱ्या देशांची संख्या आणि त्यांची ताकद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या 'इयरबुक 2025' नुसार, जानेवारी 2025 पर्यंत जगातील 9 देशांकडे मिळून एकूण 12,241 परमाणु शस्त्रे आहेत. या नऊ देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. या अहवालात गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे की, जागतिक तणाव असूनही अनेक देश त्यांचे अण्वस्त्र कार्यक्रम (Nuclear Program) अपग्रेड करत आहेत.
अण्वस्त्रधारी देशांची ताकद
रशिया-युक्रेन युद्ध आणि मध्य-पूर्वेतील संघर्षांदरम्यान अण्वस्त्रांपासून दूर राहण्याची चर्चा होत असली तरी, त्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. जगातील 9 अण्वस्त्रधारी देशांकडील शस्त्रसाठा (संख्या आणि स्थिती) खालीलप्रमाणे आहे:
रशिया (Russia): 5,459 शस्त्रे. हा जगातील सर्वात मोठा न्यूक्लियर आर्सेनल (Nuclear Arsenal) आहे आणि अनेक शस्त्रे 'हाय अलर्ट'वर (High Alert) आहेत.
अमेरिका (USA): 5,177 शस्त्रे. हा सर्वाधिक अण्वस्त्रे बाळगणाऱ्या देशांपैकी एक आहे आणि सतत आधुनिकीकरण (Modernization) करत आहे.
चीन (China): 600 शस्त्रे. चीनचा अण्वस्त्र कार्यक्रम वेगाने वाढत आहे आणि ते नवीन क्षेपणास्त्र प्रणाली (Missile System) विकसित करत आहे.
फ्रान्स (France): 290 शस्त्रे. युरोपमधील प्रमुख अण्वस्त्रधारी देश आणि नाटो (NATO) सदस्य.
ब्रिटन (UK): 225 शस्त्रे. हा देश 'ट्रायडेंट क्षेपणास्त्र प्रणाली'वर अवलंबून असून, त्यांच्याकडे मर्यादित पण आधुनिक साठा आहे.
भारत (India): 180 शस्त्रे. भारत 'नो फर्स्ट यूज' (No First Use) धोरणाचे पालन करतो आणि क्षेपणास्त्रांची मारक क्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.
पाकिस्तान (Pakistan): 170 शस्त्रे. भारताच्या विरोधात न्यूक्लियर समतोल राखण्याचे (Nuclear Balance) पाकिस्तानचे धोरण आहे.
इस्त्रायल (Israel): 90 शस्त्रे. इस्त्रायलने औपचारिकपणे स्वतःला अण्वस्त्रधारी देश मानले नाही, परंतु ते अण्विक क्षमता (Atomic Capability) बाळगतात.
उत्तर कोरिया (North Korea): 50 शस्त्रे. सातत्याने क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे हा देश जागतिक चिंतेचे केंद्र बनला आहे.
हेही वाचा - भयंकर दुष्काळ! नद्या कोरड्या ठणठणीत, धरणं आटली; या देशातलं पाणी दोन आठवड्यांत संपणार?
चिंताजनक आकडेवारी आणि आधुनिकीकरण
SIPRI अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, सुमारे 3,912 अण्वस्त्रे जगभरातील क्षेपणास्त्रांवर आणि विमानांवर तैनात (Deployed) आहेत. यापैकी 2,100 शस्त्रे 'हाय अलर्ट'वर ठेवण्यात आली आहेत, म्हणजे ती मिनिटांत वापरली जाऊ शकतात.
अपग्रेडेशन: सर्वच्या सर्व 9 अण्वस्त्रधारी देश सध्या त्यांच्या 'न्यूक्लियर मॉडर्नायझेशन प्रोग्राम्स'वर काम करत आहेत, ज्याअंतर्गत जुन्या शस्त्रांना नवीन तंत्रज्ञानाने अपग्रेड केले जात आहे.
सातत्याने निर्मिती: अहवालाच्या मते, मागील वर्षाच्या तुलनेत काही देशांनी जुनी अण्वस्त्रे नष्ट केली असली तरी, जेवढी शस्त्रे नष्ट झाली. जवळपास तेवढ्याच संख्येत नवीन शस्त्रांची निर्मितीही केली जात आहे. यामुळे जग अजूनही अणुयुद्धाच्या धोक्यातून पूर्णपणे बाहेर आलेले नाही.
हेही वाचा - New York Mayor Election: चित्रपट निर्माती मीरा नायरचा मुलगा न्यूयॉर्कचा महापौर! जोहरान ममदानी कोण आहेत?