Sunday, May 19, 2024 08:18:16 AM

शुक्रवारी दुसऱ्या टप्प्याचे मतदान

शुक्रवारी दुसऱ्या टप्प्याचे मतदान

नवी दिल्ली, २५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशातल्या १३ राज्यांतील ८९ जागांवर मतदान होणार आहे. याआधी १९ जूनच्या शुक्रवारी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २१ राज्यांतील १०२ जागांवर मतदान झाले. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात वायनाडमध्ये राहुल गांधींच्या जागेवर मतदान होणार आहे.

देशातील कोणत्या राज्यांतील किती जागांवर होणार मतदान ?

केरळ - २०
कर्नाटक - १४
राजस्थान - १३
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश - प्रत्येकी ८
मध्य प्रदेश - ७
आसाम आणि बिहार - प्रत्येकी ५
छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल - प्रत्येकी ३
मणिपूर, त्रिपुरा आणि जम्मू काश्मीर - प्रत्येकी १
एकूण १२०६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार

महाराष्ट्र - दुसरा टप्पा – मतदान २६ एप्रिल २०२४

बुलढाणा – प्रतापराव जाधव, शिवसेना विरुद्ध प्रा. नरेंद्र खेडेकर, शिउबाठा विरुद्ध वसंतराव मगर, वंचित विरुद्ध संजय गायकवाड, शिवसेना बंडखोर विरुद्ध नंदू लवंगे, ओबीसी बहुजन विरुद्ध रविकांत तुपकर, बंडखोर
अकोला – अनुप धोत्रे, भाजपा विरुद्ध अभय पाटील, काँग्रेस विरुद्ध प्रकाश आंबेडकर, वंचित
अमरावती – नवनीत राणा, भाजपा विरुद्ध बळवंत वानखेडे, काँग्रेस विरुद्ध प्राजक्ता पिल्लेवान, वंचित
वर्धा – रामदास तडस, भाजपा विरुद्ध अमर काळे, राशप विरुद्ध प्रा. राजेंद्र साळुंके, वंचित
यवतमाळ – वाशिम – राजश्री पाटील, शिवसेना विरुद्ध संजय देशमुख, शिउबाठा विरुद्ध खेमसिंग पवार, वंचित
नांदेड – प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपा विरुद्ध डॉ. वसंतराव चव्हाण, काँग्रेस विरुद्ध अॅड. अविनाश भोसीकर, वंचित
परभणी – महादेव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध संजय जाधव, शिउबाठा विरुद्ध पंजाबराव डख, वंचित
हिंगोली – बाबूराव कदम कोहळीकर, शिवसेना विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर, शिउबाठा विरुद्ध डॉ. बी. डी. चव्हाण, वंचित विरुद्ध विरुद्ध अॅड. रवी शिंदे, ओबीसी बहुजन


सम्बन्धित सामग्री