Sunday, May 19, 2024 06:50:54 AM

दुसरा टप्पा काय सांगतो?

दुसरा टप्पा काय सांगतो

अमरावती, २६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज (26 एप्रिल) मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यांतील (एक केंद्रशासित प्रदेश) 88 जागांवर मतदान झाले. या टप्प्यात आधी 88 जागांवर मतदान होणार होते, मात्र मध्य प्रदेशातील बैतुल मतदारसंघातील बसपाच्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याने 88 जागांवर मतदान झाले. या जागांसाठी एकूण 1198 उमेदवार रिंगणात आहेत, त्यापैकी 1097 पुरुष आणि 100 महिला उमेदवार आहेत, तर एक उमेदवार तृतीयपंथी आहे. दुसऱ्या टप्प्यात 60 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मात्र, तुलनेत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये कमी मतदानाची नोंद झाली आहे.

देशातील मतदानाची टक्केवारी

आसाम ७०. ७८
बिहार ५४.९१
छत्तीसगड ७३.०५
जम्मू काश्मीर ७१.६३
कर्नाटक ६७.२९
केरळ ६५.२८
मध्य प्रदेश ५६.७६
महाराष्ट्र ५४.३४
मणीपूर ७७.१८
राजस्थान ६३.८८
त्रिपुरा ७८.६३
उत्तर प्रदेश ५४.८३
पश्चिम बंगाल ७१.८४


सम्बन्धित सामग्री