Tuesday, May 21, 2024 07:50:42 PM

कोल्हापुरात खऱ्या वारसदाराला वाद कायम

कोल्हापुरात खऱ्या वारसदाराला वाद कायम

कोल्हापूर, ३० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत वेगळाच वाद उफाळून आलाय.. गादीच्या ख-या वारसदाराचा हा वाद आहे. कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज, तर महायुतीकडून संजय मंडलिक अशी लढत रंगलीय. राजर्षी शाहू महाराजांचे पणतू राजवर्धनसिंह कदमबांडे यांना मंडलिकांच्या प्रचारासाठी मैदानात उतरवलंय. कोल्हापूरच्या गादीचे खरे वारसदार आपणच आहोत, असा दावा कदमबांडेंनी केलाय. त्यामुळे कोल्हापूरच्या गादीचा वाद आता चर्चेचा विषय बनला आहे. पाहुयात काय प्रकरण आहे आणि काय दवे प्रतिदावे याबाबत केले जात आहेत.

https://youtu.be/4HbeIsoN4Tc

कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कोल्हापुरात शाहू महाराजांच्या वारसाचा वाद पुन्हा सुरु झालाय. राजवर्धन कदमबांडेंचा दावा आहे की तेच खरे गादीचे रक्ताचे आणि विचारांचेही वारसदार आहेत. यावर छत्रपती शाहूंच्या बाजूनं एका पत्राद्वारे उत्तर देण्यात आलंय.

रक्ताचा वारसदार असल्याचा दावा केल्यानंतर शाहू महाराज यांनीही राजर्षी शाहू महाराज यांच्या रक्ताचा आणि विचारांचा खरा वारसदार असल्याचे प्रत्युत्तर दिलं आहे. एक परिपत्रक जारी करत यावर उत्तर दिलं आहे पाहुयात या पत्रकात काय म्हटलं आहे.

राजर्षी शाहू महाराजांच्या रक्ताचा वारस म्हणून शहाजी महाराज यांनी मला दत्तक घेतले.
त्यामुळे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा आपण कायदेशीर वारसदार
दत्तक विधानानंतर छत्रपती घराण्याचा मी वारसदार आहेच
पण त्याच बरोबर मी शाहू विचारांचा वारसदार आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे.
गेल्या साठ वर्षात राजर्षी शाहू, फुले, आंबेडकर यांचा समतावादी विचार
राज्य आणि देशातही पोहोचविण्यासाठी माझे अखंड परिश्रम सुरू आहेत.
राजर्षी शाहूंच्या विचारांचा वारस असल्याने जनतेने मला स्वीकारले आहे.

दत्तकाचा वाद नेमका आताच कसा उफाळून आला? यावरुन कोल्हापुरात चर्चा होत आहेत. मात्र रक्ताचे वारस हाच मुद्दा महत्वाचा असेल तर भविष्यात राजर्षी शाहू महाराज किंवा बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांवरही प्रश्न उभे केले जातील. हा वाद आजचा नसून जुनाच आहे.

दत्तक प्रकरणामध्ये भाऊसाहेब महागावकर यांचा महत्त्वाचा वाटा आहे. कोल्हापुरातील प्रत्येक प्रकरणाच्या वेळा लोकांना थांबवण्याचे आणि वाड्यावर न येऊ देण्याची महत्त्वाची भूमिका तात्कालीन खासदार कै. भाऊसाहेब महागावकर यांनी पार पाडली होती. त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेच्याखाली शहाजीमहाराज यांनी कोल्हापूरची वेस ओलांडली होती.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं ही जुनी खपली पुन्हा निघालीय. शाहू महाराज विरुद्ध मंडलिक या राजकीय सामन्याला आता शाहू महाराज विरुद्ध राजवर्धनसिंह कदमबांडे असं वळण लागलंय. गादी विरुद्ध गादी असा नवा संघर्ष कोल्हापुरात रंगू लागलाय. मान गादीला असं गर्वानं सांगणारे कोल्हापूरकर नेमकं कोणत्या गादीला मान देतात आणि कुणाला मत देतात, यासाठी ४ जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.


सम्बन्धित सामग्री